Darul Uloom
Darul Uloom Dainik Gomantak
देश

Darul Uloom: 'गझवा-ए-हिंद'च्या फतव्यामुळे दारुल उलूम देवबंद पुन्हा चर्चेत; राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने केली कारवाईची मागणी

Manish Jadhav

Darul Uloom: जगप्रसिद्ध इस्लामिक शिक्षण केंद्र दारुल उलूम देवबंद 'गझवा-ए-हिंद' चा गौरव करणाऱ्या फतव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. या इस्लामिक संस्थेने आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून हा फतवा काढला आहे. यातच आता, या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाने (NCPCR) हा फतवा देशविरोधी असल्याचे सांगत सहारनपूर डीएम आणि एसएसपी यांना एफआयआर दाखल करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, काही व्यक्तीने दारुल उलूम देवबंदकडून गझवा-ए-हिंदची माहिती मागवली होती. हदीसमध्ये याचा उल्लेख आहे का, असे विचारले असता? दारुल उलूम देवबंदने आपल्या उत्तरात नंबर 9604 मध्ये सहिहसिता, सुनन अल-नसाई या पुस्तकाचा हवाला दिला आणि म्हटले की, त्यात 'गझवा-ए-हिंद' संदर्भात एक संपूर्ण प्रकरण आहे.

फतव्यात नमूद केले आहे

यामध्ये हजरत अबू हुरैरा (जे पैगंबर मोहम्मद यांच्या जवळचे होते) यांच्याकडून एक हदीस सांगितली गेली आहे. त्यात त्यांनी गझवा-ए-हिंदबाबत म्हटले होते की, ''मी त्यासाठी लढेन आणि त्यात माझी सर्व संपत्ती कुर्बान करेन. यामध्ये जर मी मेलो तर एक ते माझे बलिदान असेल. मात्र, मी जिवंत राहिलो तर मला 'गाझी' म्हणतील.'' हजरत मोहम्मद साहिब यांनीही याबाबत भविष्यवाणी केली होती. पुस्तक छापणाऱ्या कंपनीचे नावही फतव्यात नमूद करण्यात आले आहे.

बाल संरक्षण आयोगाने याला देशविरोधी म्हटले

दारुल उलूमच्या या फतव्यानंतर बाल संरक्षण आयोगाने त्याला 'देशद्रोही' ठरवले. गझवा-ए-हिंदचा इस्लामी दृष्टिकोनातून वैधानिक म्हणून गौरव करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत सहारनपूर जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन याप्रकरणी एफआयआर नोंदवावा. आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी यासंदर्भात सहारनपूर डीएम आणि एसएसपी यांना पत्र पाठवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT