Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट
Goa PoliceDainik Gomantak

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Police: उत्तर गोव्यातील कळंगुट - बागा बीचवर आले असता परदेशी महिलेचा लहान मुलगा अचानक बेपत्ता झाला.
Published on

कळंगुट/ बागा: उत्तर गोव्यातील बागा बीचवरुन कझाकस्तानच्या पर्यटक महिलेचा नऊ वर्षाचा लहान मुलगा अचानक बेपत्ता झाला. महिलेने घटनेची माहिती दृष्टी जीवरक्षक आणि गोवा पोलिसांनी दिली. बेपत्ता मुलाचा पोलिसांना तात्काळ शोध घेऊन ओळख पटवून महिलेला परत केला. सोमवारी (१८ नोव्हेंबर) हा प्रकार उघडकीस आला.

उत्तर गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कझाकस्तानचे एक पर्यटक कुटुंब गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आले आहे. उत्तर गोव्यातील कळंगुट - बागा बीचवर आले असता महिलेचा लहान मुलगा अचानक बेपत्ता झाला.

महिलेने मुलगा बेपत्ता झाल्याची माहिती गोवा पोलिसांनी (Goa Police) दिली. पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत कळंगुटकर आणि महिला होम गार्ड बबिता मुळ्ये यांनी तात्काळ बेपत्ता मुलाचा शोध सुरु केला.

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट
Antarctic Climate Change: अंटार्क्टिका किनारपट्टीतील हवामान बदलाचा होणार अभ्यास, गोव्यातून सात संशोधक घेणार सहभाग

कळंगुटकर आणि मुळ्ये यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले व काही वेळातच पोलिसांनी बेपत्ता मुलाचा शोध आला. ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी मुलाला मूळ मातेच्या स्वाधीन करण्यात आले. तक्रारदार महिला फोमिनस्काया येलेना (Kazakhstan Tourist In Goa) यांनी मुलगा परत मिळाल्यानंतर गोवा पोलिसांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com