Sadye Panchayat
Sadye GramsabhaDainik Gomantak

Sadye: बहुमजली तसेच जलतरण प्रकल्पांना पाणीपुरवठा बंद करा! सडये ग्रामस्थांची मागणी; सामूहिक शेतीला देणार प्राधान्य

Sadye Gramsabha: सडये- पंचायतीच्या ग्रामसभेत होऊ घातलेल्या बहुमजली प्रकल्प तसेच जलतरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा तत्काळ बंद करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ही ग्रामसभा गावच्या विकासकामांवरून गाजली.
Published on

Sadye Panchayat Gramsabha

शिवोली: सडये- पंचायतीच्या ग्रामसभेत होऊ घातलेल्या बहुमजली प्रकल्प तसेच जलतरण प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा तत्काळ बंद करावा,अशी मागणी ग्रामस्थांनी रविवारी केली. ही ग्रामसभा गावच्या विकासकामांवरून गाजली.

यावेळी, सीएसआर निधीचा उपयोग गावच्या विकासकामांसाठी तसेच स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी उपयोगात आणण्याचे पंचायत मंडळाकडून निश्चित करण्यात आले. दरम्यान, रविवारी सकाळी १०.३० वा. सुरू झालेली ही ग्रामसभा दुपारी एक पर्यत चालली होती. यावेळी, ग्रामस्थांनी पंचक्रोशीतील विविध विकासकामांवरून चाललेल्या चर्चेत सहभाग घेतला.

दरम्यान , सडये पंचायतीच्या कक्षेत होऊ घातलेल्या बहुमजली रहिवासी प्रकल्पांना तसेच तेथील जलतरण प्रकल्पांना सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होत असलेला पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा, असे स्थानिक ग्रामस्थ पीटर फर्नांडिस यांनी ग्रामसभेत सांगितले. तिळारीतून येणारे पाणी थेट या प्रकल्पांना देऊ कामा नये, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,असा इशाराही फर्नांडिस यांनी दिला.

Sadye Panchayat
Cash For Job: पोलिस भाजपचे प्रवक्‍ते आहेत का? युरी, सरदेसाईंचा संताप; उच्‍चस्‍तरीय चौकशीवर बाबूशही ठाम

सामूहिक शेतीला प्राधान्य देणार!

सडये पंचक्रोशीतील पडीक शेतजमिनीत सामूहिक शेती लागवड करण्यासाठी स्थानिक तरुण-तरुणींना प्रोत्साहित करण्यात येणार असून येत्या हंगामापासून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी पंचायत मंडळ प्रयत्नशील असल्याचे सरपंच दीपा पेडणेकर तसेच उपसरपंच नीलेश वायंगणकर यांनी ग्रामस्थांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. शिवाय अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाला लवकरच गती देण्याचे आश्वासन पंचायत मंडळाकडून सभेला देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com