Sandeshkhali Case: संदेशखळीत आणखी एक बलात्काराचे प्रकरण, महिलेचा TMC नेते शिबू हाजरा यांच्यावर आरोप

West Bengal Crime: राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेतल्यानंतर टीएमसी नेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
Sandeshkhali Case
Sandeshkhali CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Sandeshkhali Case:

पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे महिलांवर बलात्कार आणि छळाचे आरोप सुरुच आहेत. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे दबंग नेते शाहजहान शेख यांच्या जवळच्या साथीदाराविरुद्ध आता आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. शेख यांचे निकटवर्तीय आणि टीएमसी नेते शिबू हाजरा यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये सूत्रांचा हवाला देत संदेशखळी येथील रहिवासी असलेल्या महिलेने राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेतल्यानंतर टीएमसी नेत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संदेशखळी पोलिस (Police) ठाण्यात नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकत्याच शर्मा संदेशखळी येथे पोहोचल्या होत्या. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती.

Sandeshkhali Case
Sandeshkhali Violence: ''पाकिस्तानात हिंदू महिलांवर असे अत्याचार होतात...'', संदेशखळी प्रकरणावरुन भाजप खासदार ममता सरकारवर बरसल्या

दरम्यान, हाजरा यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 376 अर्थात भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. हाजरा यांना पोलिसांनी 17 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. संदेशखळी येथील महिलेने दिलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरुनच पोलिसांनी कारवाई केली होती. शेख आणि त्याच्या साथीदारांवर महिलांचा छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप आहे.

Sandeshkhali Case
NCSC Sandeshkhali Visit: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे पथक पोहोचले संदेशखळीत; अध्यक्ष म्हणाले...

शेख फरार आहेत

दरम्यान, याठिकाणी आतापर्यंत पोलिसांना शेखचा मागमूसही लागलेला नाही. 5 जानेवारी रोजी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) पथक एका प्रकरणात छापा टाकण्यासाठी शेख यांच्या घरी पोहोचले होते. त्यादरम्यान टीएमसी नेत्याच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. विशेष म्हणजेज, या हल्ल्यात अधिकारीही जखमी झाले होते. या घटनेपासून शेख हे फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

संदेशखळीची घटना

शेख आणि त्याच्या साथीदारांवर संदेशखळीतील अनेक महिलांनी आरोप केले आहेत. महिलांचा आरोप आहे की, महिलांना टीएमसी (TMC) पक्ष कार्यालयात नेण्यात आले, जिथे पक्षाचे नेत्यांनी त्यांच्यासोबत चुकीचे कृत्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com