NIA Raid: गझवा-ए-हिंद मॉड्यूलबाबत एनआयएची मोठी कारवाई, तीन राज्यांत छापेमारी!

What is Ghazwa-E-Hind: छापेमारीत डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, मेमरी कार्ड्स), सिमकार्ड आणि कागदपत्रांसह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
NIA
NIADainik Gomantak
Published on
Updated on

NIA Raids: गेल्या वर्षी बिहारमध्ये पर्दाफाश झालेल्या 'गझवा-ए-हिंद' या दहशतवादी मॉड्युलच्या चौकशीचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) रविवारी तीन राज्यांमध्ये छापेमारी केली आहे.

तपासात असे समोर आले की, ते पाकिस्तानातील संशयितांकडून चालवले जात होते. दरभंगामधील एक आणि पाटणामधील दोन, सुरत (गुजरात) आणि बरेली (उत्तर प्रदेश) येथे एक अशा एकूण पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

छापेमारीत डिजिटल उपकरणे (मोबाईल फोन, मेमरी कार्ड्स), सिमकार्ड आणि कागदपत्रांसह गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

अटकेनंतर खुलासा

अधिकाऱ्याने सांगितले की, 'बिहार पोलिसांनी फुलवारी शरीफच्या मरगुब अहमद दानिश उर्फ ​​ताहिरला अटक केली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध 14 जुलै 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. NIA ने 22 जुलै 2022 रोजी या प्रकरणाचा ताबा घेतला. 6 जानेवारी रोजी मरगुबविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

NIA
Terror Funding Case: NIA कडून 13 पाकिस्तानी नागरिकांवर आरोपपत्र; आखत होते दहशत पसरवण्याचा कट

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, आरोपी (Accused) हा पाकिस्तानस्थित चालणाऱ्या एका मॉड्यूलचा सदस्य असल्याचे आढळून आले आहे. देशात गझवा-ए-हिंद स्थापन करण्यासाठी तरुणांना कट्टरपंथी बनवणे हा त्याचा उद्देश होता.

तसेच, झैन नावाच्या पाकिस्तानी नागरिकाने बनवलेल्या 'गझवा-ए-हिंद' या व्हॉट्सअॅप ग्रुपचा मरगुब हा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात समोर आले आहे. दहशतवादी कारवाया करण्यासाठी देशात स्लीपर सेल तयार करण्याच्या उद्देशाने त्याने अनेक भारतीय, पाकिस्तानी, बांगलादेशी आणि येमेनी नागरिकांना या ग्रपमध्ये सामील केले होते.

NIA
Jammu And Kashmir: G20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये NIA ची मोठी कारवाई, जैश-ए चा दहशतवादी अटकेत!

सोशल मीडिया ग्रुपच्या माध्यमातून काम करण्यात आले

आरोपींनी व्हॉट्सअॅप, टेलिग्राम आणि बीआयपी मेसेंजरवर 'गझवा-ए-हिंद'चे विविध सोशल मीडिया ग्रुप तयार केले होते. त्याने 'बिडीगझवा ए हिंदबिडी' नावाचा आणखी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करुन त्यात बांगलादेशी नागरिकांना सामील केले होते.

या प्रकरणातील विविध संशयित पाकिस्तानातील (Pakistan) हस्तकांच्या संपर्कात होते आणि गझवा-ए-हिंदचा प्रचार करण्यात गुंतले होते, असे तपासात समोर आले आहे.

रविवारी तीन राज्यांमध्ये या संशयितांच्या ठिकाणांवर एनआयएने छापे टाकले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com