Sadhvi Prachi Dainik Gomantak
देश

Sadhvi Prachi on Love Jihad: 'देशभरातील मदरसे बंद करा, इथूनच लव्ह जिहाद...', साध्वी प्राची यांचं धक्कादायक वक्तव्य

Sadhvi Prachi: विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या आपल्या भडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात.

Manish Jadhav

Shocking Statement Of Sadhvi Prachi: विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची या आपल्या भडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. रविवारी साध्वी प्राची यांनी लव्ह जिहादबाबत मोठे वक्तव्य केले.

साध्वी प्राची म्हणाल्या की, देशभरातील सर्व मदरसे बंद करावेत. येथूनच लव्ह जिहादची सुरुवात होते. त्याचबरोबर त्या पुढे म्हणाल्या की, हिंदू (Hindu) फक्त पैसा कमावण्याचा विचार करतो. तर एका विशिष्ट समाजाचे लोक भारतावर राज्य करण्याचा विचार करतात. हा अजेंडा हजारो वर्षांपासून सुरु आहे.

दरम्यान, बरेलीमध्ये माध्यमांशी बोलताना साध्वी प्राची म्हणाल्या की, मदरसे बंद होताच देशातून लव्ह जिहादही संपेल. केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही शांतता नांदेल.

अखिलेश यांनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न सोडावे

सपा प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न सोडावे, असे साध्वी प्राची म्हणाल्या. ते यूपीचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान होणार नाहीत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदी पुन्हा सत्तेत येणार आहेत. देशातील जनता पंतप्रधान मोदींनाच मतदान करेल. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, असेही प्राची म्हणाल्या.

तसेच, लव्ह जिहाद आणि जबरदस्तीने धर्मांतराची अनेक प्रकरणे देशभरात समोर आली आहेत. देशाची राजधानी दिल्लीपासून मध्य प्रदेशपर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये एका गेमिंग अॅपच्या माध्यमातून धर्मांतराचा प्रकार समोर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT