Rupali Ganguly Defamation Case Dainik Gomantak
देश

Rupali Ganguly Defamation Case: रुपाली गांगुलीला दिलासा, वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या सावत्र मुलीला दणका

Rupali Ganguly Case: 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रुपाली गांगुलीवर तिच्या सावत्र मुलीनं गंभीर आरोप केले होते.

Sameer Amunekar

Rupali Ganguly Vs Step Daughter Esha Verma Case

मुंबई : 'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रुपाली गांगुलीवर तिच्या सावत्र मुलीनं गंभीर आरोप केले होते. यानंतर रुपाली गांगुलीने तिची सावत्र मुलगी ईशा वर्मावर 50 कोटींची मानहानीही नोटीस धाडली होती. दरम्यान, ईशा वर्मानं रूपालीबाबत कोणतीही अपमानास्पद विधानं करू नयेत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

ईशा वर्मानं केलेल्या आरोपांविरोधात रुपालीने थेट 50 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. माझी प्रतिमा आणि खासगी आयुष्य मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रुपालीने ईशावर केला होता. ईशाने केलेले सर्व आरोप खोटे आणि प्रतिमेला धक्का पोहोचवणारे असल्याचं तिनं सांगितलं होतं.

दरम्यान, ईशा वर्मा आणि रूपाली गांगुली यांच्यात सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयानं निर्देश दिले. या मानहानीच्या प्रकरणात रूपालीला दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयानं रुपालीच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे, बदनामीकारक मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यापासून रोखण्यास सांगितलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रुपाली यांच्या याचिकेत सादर केलेल्या पुराव्यांचा आढावा घेतला. या पुराव्यांमध्ये सोशल मीडिया पोस्ट, मुलाखती आणि लेखांचा संग्रह समाविष्ट होता. यामध्ये बदनामीकारक विधानांचा समावेश होता. खंडपीठाला या पुराव्यांमध्ये रूपालीबाबत बदनामीकारक मजकूर आढळून आले.

खंडपीठाने रूपाली गांगुलीविरुद्ध कोणतीही अपमानास्पद पोस्ट, व्हिडिओ किंवा मजकूर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकाशित करण्यापासून बंदी घातली आहे. रूपाली गांगुलीच्या वकिलाने सांगितले की, सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकूरांमूळं रूपालीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचेही नुकसान झालं आहे.

रूपाली अश्विन वर्माची तिसरी पत्नी

बदनामीकारक मजकूर आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असं न्यायालयावं स्पष्ट केलं आहे. रूपाली गांगुली ही अश्विन वर्माची तिसरी पत्नी आहे. तर ईशा वर्मा ही अश्विन वर्माच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी आहे.

ईशा वर्मानं नेमके काय आरोप केले होते?

रुपाली गांगुलीने 2013 मध्ये अश्विन वर्मासोबत लग्न केलं. या दोघांना एक मुलगा आहे. त्याआधी अश्विनची दोन लग्न झाली होती. पहिल्या दोन लग्नातून त्याला दोन मुली आहेत. 2020 मध्ये अश्विनची मुलगी ईशाने फेसबुकवर पोस्ट शेअर करत रुपालीवर गंभीर आरोप केले होते.

रुपाली गांगुलीचं अश्विन वर्मा यांच्याशी बारा वर्षांपासून अफेअर होतं. अश्विनला पहिल्या दोन लग्नातून दोन मुली आहेत. रुपाली ही अत्यंत क्रूर मनाची महिला आहे. तिने मला आणि माझ्या बहिणीला दूर करण्याचा प्रयत्न केला. तिने आम्हाला आमच्याच वडिलांपासून दूर केलं आहे, असं ईशा वर्मा म्हणाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT