The Bike Resort In Goa: ‘द बाईक रिसॉर्ट’च्या 110 खोल्यांना टाळं, सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात हालगर्जीपणा; प्रशासनाची कारवाई

Dalmia company Bike Resort: जिल्हा प्रशासनाने दालमिया कंपनीच्या मोबोर-केळशी येथील ‘द बाईक रिसॉर्ट’ या तारांकित हॉटेलच्या तब्बल ११० खोल्यांना टाळे ठोकले.
The Bike Resort In Goa: ‘द बाईक रिसॉर्ट’च्या 110 खोल्यांना टाळं, प्रशासनाची कारवाई; सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात हालगर्जीपणा
District administration seals hotelDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: हॉटेलमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात हलगर्जीपणा केल्याने जिल्हा प्रशासनाने दालमिया कंपनीच्या मोबोर-केळशी येथील ‘द बाईक रिसॉर्ट’ या तारांकित हॉटेलच्या तब्बल ११० खोल्यांना टाळे ठोकले.

सासष्टीचे मामलेदार विमोद दलाल यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार ही कारवाई केल्याची माहिती दलाल यांनी दिली. या हॉटेलला (Hotel) पूर्वी ‘ओल्ड ॲंकर’ या नावाने ओळखले जात होते. या हॉटेलचा परवाना संपल्याने या परवान्याच्या नूतनीकरणासाठी हॉटेलतर्फे अर्ज केला होता.

The Bike Resort In Goa: ‘द बाईक रिसॉर्ट’च्या 110 खोल्यांना टाळं, प्रशासनाची कारवाई; सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यात हालगर्जीपणा
Goa Tourism: थोडा है, थोडे की जरुरत है! गोव्याच्या पर्यटनावर कोल्हापुरच्या पर्यटकाने मांडले रोखठोक मत

मात्र, हॉटेलची तपासणी केली असता तेथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नादुरुस्त असल्याचे आढळून आले. या हॉटेलचे सांडपाणी उघड्या नाल्यात सोडल्याचे दिसून आल्यामुळे ही कारवाई केल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली. या हॉटेलला यापूर्वीही प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com