Run For Modi & Flash Mob Event London  Dainik Gomantak
देश

Watch Video: लंडनमध्ये PM मोदींची धूम! रन फॉर मोदी आणि फ्लॅश मॉब कार्यक्रमाचं भव्य आयोजन; भारतीय समुदायानं...

Run For Modi & Flash Mob Event London: लंडनमधील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी यूके (यूके चॅप्टर) ने रविवारी (28 एप्रिल) रन फॉर मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले.

Manish Jadhav

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कंबर कसली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

दरम्यान, लंडनमधील ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी यूके (यूके चॅप्टर) ने रविवारी (28 एप्रिल) रन फॉर मोदी कार्यक्रमाचे आयोजन केले. नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक प्रचारासाठी एकजूट दाखवणे आणि पाठिंबा देणे हा या आयोजनामागचा उद्देश होता. प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्रिटनमधील भारतीय समुदायाने भाजप (BJP) आणि पंतप्रधान मोदींना पाठिंबा दर्शवला. आयोजकांनी हा कार्यक्रम यशस्वी करुन दाखवला. पाऊस असूनही या कार्यक्रमाला 500 हून अधिक लोकांनी हजेरी लावली.

रन फॉर मोदी फ्लॅश मॉब इव्हेंट वेस्टमिन्स्टर पिअरपासून सुरु झाला, आणि टॉवर ब्रिज येथे संपला. विविध रंगांचे कपडे परिधान करुन, सहभागींनी पंतप्रधान मोदींच्या समर्थनार्थ एकजुटता दाखवून दिली. भव्य लंडन ब्रिजसमोर उलगडणारा लक्षवेधी फ्लॅश मॉब हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते, ज्याने प्रेक्षकांना आणि सहभागींना मंत्रमुग्ध केले.

रन फॉर मोदी कार्यक्रमात भारतीय समुदायाने एकजूट दाखवली

रन फॉर मोदी इव्हेंटने ब्रिटनमधील भारतीय समुदायामध्ये एकता आणि सौहार्दाची भावना व्यक्त केली. त्याचबरोबर भाजप आणि पंतप्रधान मोदींना त्यांनी पाठिंबा दर्शवला. OAFBJP यूकेचे उपाध्यक्ष आनंद आर्य यांनी सहभाग आणि पाठिंब्याबद्दल भारतीय समुदायाचे मनापासून आभार मानले. सुरेश मंगलगिरी (GS OAFBJP UK) यांनी यावेळी सांगितले की, रन फॉर मोदी कार्यक्रम हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपप्रती भारतीय समुदायाच्या निष्ठेचे उदाहरण आहे.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बेळगावमधून काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसनं देशात केवळ तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देशातील ''राजे-महाराजांचा'' अपमान केल्याचा आरोप केला. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी त्यांनी नवाब, निजाम, सुलतान आणि सम्राटांनी केलेल्या अत्याचारांवर एक शब्दही उच्चारला नाही, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर सडकून टीका केली.

मोदी म्हणाले की, ''काँग्रेसने तुष्टीकरण आणि व्होट बँक लक्षात घेऊन आपला इतिहास आणि स्वातंत्र्य लढा लिहिला. विशेष म्हणजे, आजही काँग्रेसचे ‘शहजादे’ ते पाप पुढे घेऊन जात आहेत. काँग्रेसच्या (Congress) शहजाद्यानं नुकतच केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकले असेलच- ते म्हणतात की भारतातील राजे-महाराजे अत्याचारी होते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: सुपरस्टार 'रोनाल्डो' खेळणार गोव्यात? चाहत्यांचे AFC लीगकडे लक्ष; FC Goa च्या गटात येण्याची आतुरता

Vote Chori: पत्ता नेपाळींचा, राहतात भलतेच! गोवा काँग्रेसची घराघरांत जाऊन पडताळणी; बोगस मतदारांची पोलखोल

Rashi Bhavishya 15 August 2025: कुटुंबात प्रेम वाढेल, आर्थिक स्थैर्य टिकवण्यावर भर द्या; महत्त्वाचे करार यशस्वी होतील

Independence Day Wishes in Marathi: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो... स्वातंत्र्य दिनानिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' देशभक्तीभर शुभेच्छा

Betalbatim Beach: आधी जीवरक्षकाशी वाद घातला, पण त्याच 'जीवरक्षका'ने वाचवला जीव; बेताळभाटी किनाऱ्यावर पर्यटकाची बेफिकिरी!

SCROLL FOR NEXT