JNU  Dainik Gomantak
देश

JNU मध्ये पुन्हा गोंधळ, ABVP च्या विद्यार्थ्यांना मारहाण; अनेकजण जखमी

Jawaharlal Nehru University: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) हिंसाचार आणि गोंधळाची घटना समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Jawaharlal Nehru University: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (JNU) हिंसाचार आणि गोंधळाची घटना समोर आली आहे. शिष्यवृत्ती घेण्यासाठी विद्यार्थी इथे आले होते, असे सांगण्यात येत आहे. याचदरम्यान तिथे उपस्थित असलेल्या सुरक्षारक्षकांशी विद्यार्थ्यांची झटापट झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एबीव्हीपी-समर्थित विद्यार्थ्यांनी फेलोशिप जारी न केल्याबद्दल जेएनयूमधील वित्त अधिकाऱ्याचा घेराव केला. फेलोशिपच्या मुद्द्यावरुन वाद सुरु असताना एबीव्हीपी समर्थक असलेल्या जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी वित्त अधिकाऱ्यालाही दोन तास ओलीस ठेवले.

दरम्यान, ABVV ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात म्हटले आहे की, 'जेएनयूच्या रेक्टरच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शिष्यवृत्तीसाठी एबीव्हीपी आंदोलन करत होती. यादरम्यानच जेएनयूमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या रेक्टरच्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला.'

दुसरीकडे, विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, 'वर्षानुवर्षे रखडलेल्या फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाविरुद्ध आवाज उठवला. यादरम्यानच फेलोशिप मागण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर व्यवस्थापनाने गुंडागर्दी करण्याचा प्रयत्न केला.'

तसेच, विद्यापीठाकडे पैसे असतानाही प्रशासन महिनोनमहिने विद्यार्थ्यांचे पैसे हडप करत असल्याचेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. आमची स्वतःची स्कॉलरशिप मागितल्याबद्दल आम्हाला वाईट वागणूक दिली जाते, आणि मारहाण केली, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

शिवाय, जेएनयूमधील (JNU) हल्ल्याच्या या घटनेबाबत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात येत आहे की, यात सुमारे अर्धा डझन विद्यार्थी (Students) जखमी झाले आहेत. या भांडणात जेएनयूमधील अभाविप अध्यक्ष रोहित कुमारही जखमी झाला आहे. याप्रकरणी विद्यार्थी लवकरच पोलिसांत (Police) तक्रार नोंदवू शकतील, असेही बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

SCROLL FOR NEXT