virat Kohli Dainik Gomantak
देश

IPL 2025: उद्या विराटची RCB देणार KKR ला टक्कर! जाणून घ्या कसा आहे हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2025 RCB vs KKR: आयपीएल 2025 चा 58 वा सामना शनिवारी (17 मे) बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत.

Manish Jadhav

आयपीएल 2025 चा 58 वा सामना शनिवारी (17 मे) बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी पूर्णपणे सज्ज झाले आहेत. आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबी हा प्रबळ दावेदार आहे, तर केकेआरची स्थिती खूपच वाईट आहे. आरसीबीने 11 पैकी 8 सामने जिंकले असून केकेआरने 12 पैकी केवळ 5 सामने जिंकले आहेत. जर या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाल्यास कोलकात्याचं पारड वरचढ दिसतं.

आतापर्यंत आरसीबी आणि केकेआर यांच्यात एकूण 35 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये कोलकाता संघाने 20 वेळा विजय मिळवला, तर बंगळुरु संघाला 15 वेळा विजय मिळवता आला. या हंगामातही या दोघांमध्ये एक सामना झाला आहे, ज्यामध्ये कोलकाता हा सामना जिंकला होता. जेव्हाही दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा कडवी झुंज देतात. जर गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, कोलकाताने चांगली कामगिरी केली आहे. केकेआरने 4 सामने जिंकले तर आरसीबीला केवळ 1 सामना जिंकता आला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संपूर्ण संघ

विराट कोहली (Virat Kohli), रजत पाटीदार, यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवूड, रसिक दार, सुयश शर्मा, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकोब, चिक्कल, चक्की, जेकबडे, स्व. मोहित राठी, अभिनंदन सिंग, लुंगी एनगिडी.

कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ

व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नरेन, ॲन्रिक नोरखिया, हर्षित राणा, रमणदीप सिंग, क्विंटन डी कॉक, अंगक्रिश रघुवंशी, स्पेन्सर जॉन्सन, रहमानउल्ला गुरबाज, मोईन अली, वैभव अरोरा, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, अनुकूल रॉय, लवनीथ सिसोदिया, मयंक मार्कंडे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''हे तर दुबई-लंडनमध्येही नाही!' गोव्यातील 'डिजिटल ट्रायल रूम' पाहून ब्रिटिश थक्क; Watch Video

Goa Assembly Live: राज्यातील एका शाळेत झालेल्या बनावट भरती घोटाळ्याचा पर्दाफाश

Malegaon Blast: ना RDX, ना फिंगरप्रिंट! मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रज्ञा ठाकूरसह 6 जणांची निर्दोष सुटका, 'एनआयए' कोर्टाचा निर्णय; वाचा नेमकं प्रकरण?

KL Rahul: केएल राहुलचे नशीब चमकणार, कर्णधारपदासह 25 कोटी रुपये मिळणार! IPL मध्ये 'या' संघाकडून खेळणार

Bicholim: बाजारात 'नारळ' खातोय भाव, चतुर्थीत शंभरीवर जाण्याची शक्यता; ग्राहक चिंतेत

SCROLL FOR NEXT