IPL 2025: बटलरशिवाय गुजरातची प्लेऑफ, आफ्रिकन खेळाडूही साखळी सामने खेळून परतणार

Gujarat Titans: दोन दिवसांनी सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये कोण कोण परदेशी खेळाडू खेळणार, हे आता निश्चित होत आहे. गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये हुकमी फलंदाज जॉस बटलरशिवाय खेळावे लागेल.
IPL 2025
IPL 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: दोन दिवसांनी सुरू होणाऱ्या उर्वरित आयपीएलमध्ये कोण कोण परदेशी खेळाडू खेळणार, हे आता निश्चित होत आहे. गुजरात टायटन्स संघाला प्लेऑफमध्ये हुकमी फलंदाज जॉस बटलरशिवाय खेळावे लागेल. त्याच वेळी कोलकाता संघातील इंग्लंडच्या मोईन अलीने भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात २९ मेपासून व्हाईट बॉल क्रिकेटची मालिका सुरू होत आहे. बटलर आता कर्णधार नसला तरी तो इंग्लंडचा हुकमी फलंदाज आहे.

गुजरातचा संघ सध्या गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे. ११ सामन्यांतून त्यांनी १६ गुणांची कमाई केलेली आहे, त्यामुळे प्लेऑफ त्यांच्यासाठी निश्चित आहे. शुभमन गिल कर्णधार असलेल्या या संघाचे दिल्ली कॅपिटल्स (१८ मे), लखनऊ (२२ मे) आणि चेन्नई (२५ मे) असे तीन साखळी सामने शिल्लक आहेत.

IPL 2025
Goa Majhi Bus Scheme: खासगी बस मालकांसाठी आनंदवार्ता! 'माझी बस योजने'तून मिळणार अनुदान, विमा आणि आर्थिक सहाय्य

या तिन्ही सामन्यांत खेळून बटलर मायदेशी रवाना होईल. उपलब्ध माहितीनुसार गुजरात संघाने प्लेऑफसाठी बटलरऐवजी श्रीलंकेच्या कुसल मेंडीसला करारबद्ध केले आहे.

कोलकाता संघातून खेळणारा मोईन अली, जोफ्रा आर्चर (राजस्थान), सॅम करन आणि जेमी ओव्हरटन (दोन्ही चेन्नई) या इंग्लंडमधील खेळाडूंनी साखळी सामन्यांसाठीही भारतात न परतण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा लिएम लिव्हिंगस्टन आणि ऑस्ट्रेलियाचा टीम डेव्हिड बंगळूर संघात दाखल होत आहेत.

मोईन अलीने दुखापतीमुळे माघार घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वेस्ट इंडीजचा रोवमन पॉवेलही परतणार नसल्याचे कोलकाता संघाकडून सांगण्यात आले.

दक्षिण आफ्रिकन खेळाडूही प्लेऑफसाठी अनुपलब्ध

भारत-पाक सीमेवर तणाव वाढल्यानंतर दुबईत गेलेला दक्षिण आफ्रिकन मार्को यान्सेन पंजाब संघाच्या पुढील सामन्यांसाठी भारतात परतला आहे; परंतु कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यासाठी आफ्रिका संघात त्याची निवड झालेली असल्यामुळे केवळ साखळी सामने खेळून मायदेशी रवाना होईल.

IPL 2025
Goa News: धक्कादायक! गोव्यातील 62 सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ला! दिसू लागल्या कॅसिनोच्या जाहिराती

या सामन्यासाठी निवड झालेल्या यान्सेनसह एडेन मार्करम (लखनऊ), कागिसो रबाडा (गुजरात), त्रिस्टन स्टब्स (दिल्ली), लुंगी एन्गिडी (बंगळूर), वियान मुदलर (हैदराबाद), रायन रिकल्टन, कॉर्बिन बॉश (दोन्ही मुंबई इंडियन्स) या सर्व खेळाडूंना आफ्रिका मंडळाने सोमवारी (ता. २६) मायदेशी बोलावले आहे. या अंतिम सामन्याच्या तयारीसाठी आफ्रिका संघ झिम्बाब्वेविरुद्ध ३ जूनपासून सामना खेळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com