Rohit Sharma Can Break Sachin Tendulkar Record Dainik Gomantak
देश

Rohit Sharma Record: सर्वाधिक शतकं... सचिन तेंडुलकरचा 'विराट' विक्रम धोक्यात; रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

Rohit Sharma Can Break Sachin Tendulkar Record: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

Sameer Amunekar

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५ मध्ये खेळताना त्याने आपल्या फलंदाजीची चमक दाखवून दिली आहे. पहिल्या सामन्यात त्याने दीडशतकी खेळी साकारली, तर दुसऱ्या सामन्यात तो दुर्दैवाने शून्यावर बाद झाला.

मात्र, आता सर्वांचे लक्ष ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेवर लागले आहे. या मालिकेत रोहित शर्माला क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा एक मोठा जागतिक विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आता सचिन तेंडुलकरच्या बरोबरीने उभा आहे. या दोघांच्याही नावावर सलामीवीर म्हणून प्रत्येकी ४५ आंतरराष्ट्रीय शतके आहेत.

जर न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत रोहितने केवळ एक शतक झळकावले, तर तो सचिनला मागे टाकून या बाबतीत भारताचा 'नंबर १' फलंदाज ठरेल. सचिनने आपल्या कारकिर्दीची सुरुवात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करून केली होती आणि सुमारे चार वर्षांनंतर तो सलामीला येऊ लागला. दुसरीकडे, रोहितने २०१३ पासून सलामीची जबाबदारी स्वीकारली आणि तेव्हापासून त्याने शतकांचा पाऊस पाडला आहे.

सलामीवीर म्हणून जगात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सध्या ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने सलामीला येऊन ४९ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्यानंतर रोहित आणि सचिन ४५ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल ४२ शतकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

रोहित ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे, ते पाहता तो लवकरच वॉर्नरचा विक्रमही मोडीत काढेल, अशी चिन्हे दिसत आहेत. ११ जानेवारीपासून सुरू होणारी मालिका रोहितसाठी ऐतिहासिक ठरणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मृत्यूचा सापळा बनला होता 'बर्च' क्लब, नियम धाब्यावर बसवून मिळाले परवाने; चौकशी अहवालाचा 'खळबळजनक' निष्कर्ष

"गोव्याच्या मुक्तिलढ्यात, जडणघडणीत मराठा समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान"; मुख्यमंत्री डॉ. सावंत

Goa News Live: वागातोरच्या 'रोमियो लेन'मधील अतिक्रमणावर पर्यटन खात्याचा हातोडा

Goa Road Closure: पर्वरीकरांनो सावधान! 2 जानेवारीपासून महामार्गावर मोठे बदल; असा असेल तुमचा प्रवासाचा नवा मार्ग

VIDEO: सराव सत्रादरम्यान मैदानावरच बेशुद्ध पडले अन्... विश्वचषक जिंकवून देणाऱ्या प्रशिक्षकाचं निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

SCROLL FOR NEXT