Abdul Bari Siddiqui Dainik Gomantak
देश

Bihar Politics: 'परदेशात स्थायिक व्हा, भारतातील वातावरण...', मुस्लिम नेत्याचा मुलांना सल्ला

Abdul Bari Siddiqui: भारतातील वातावरण सध्या चांगले नाही, असे राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

Abdul Bari Siddiqui: भारतातील वातावरण सध्या चांगले नाही, असे राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या मुलांना परदेशी नागरिकत्व घेण्याचा सल्ला दिला आहे. अब्दुल बारी सिद्दीकी यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओमध्ये अब्दुल बारी सिद्दीकी एका कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणतात की, मी माझ्या मुलांना तिथेच नोकरी करण्यास सांगितले आहे. नागरिकत्व मिळाले तर घ्या...

ते पुढे म्हणाले की, 'मुलांना मातृभूमी सोडण्यास कोण सांगेल, पण ही वेळ आली आहे, हे तुम्ही समजू शकता.' सिद्दीकी यांनी सांगितले की, 'मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा हार्वर्डमध्ये शिकत आहे आणि मुलगी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उत्तीर्ण आहे.' बिहारमध्ये मंत्री राहिलेले अब्दुल बारी सिद्दीकी हे आरजेडीचे ज्येष्ठ नेते असून, लालू कुटुंबाचे खूप खास आहेत. RJD मधील MY (मुस्लिम-यादव) समीकरणाचा एम फॅक्टर केवळ सिद्दीकींवर अवलंबून आहे.

आता, आरजेडी नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणही सुरु झाले आहे. सिद्दीकी यांच्या वक्तव्याचा भाजप प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी निषेध केला. एक निवेदन जारी करताना निखिल आनंद यांनी म्हटले की, 'सिद्दीकीसारखे लोक धर्मनिरपेक्ष, उदारमतवादाच्या नावाखाली देशविरोधी आणि धार्मिक अजेंडा चालवतात. हे लोक अजूनही मदरसा संस्कृतीतून बाहेर पडू शकलेले नाहीत. असे लोक धर्मनिरपेक्षता आणि उदारमतवादाच्या नावाखाली देशविरोधी आणि धर्मविरोधी अजेंडा चालवतात हे सर्वश्रुत आहे. सिद्दीकी यांचे विधान RJD ची विचारधारा प्रतिबिंबित करते आणि RJD कसे धार्मिक तुष्टीकरण आणि मुस्लिमवादाचे राजकारण करते हे सिद्ध होते.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT