Lalu Prasad Yadav Dainik Gomantak
देश

रेल्वेतील नोकरी घोटाळ्याप्रकरणी CBI ची कारवाई, लालू यादवांच्या निकवर्तीयांना अटक

RJD chief Lalu Prasad Yadav: आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय भोला यादव यांना सीबीआयने अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

RJD chief Lalu Prasad Yadav: आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय भोला यादव यांना सीबीआयने अटक केली आहे. आयआरसीटीसीकडून जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोला यादव यांच्यावर ही कारवाई केली आहे. सीबीआय राज्यात चार ठिकाणी छापे टाकत आहे. रेल्वे भरती घोटाळ्यात सीबीआय भोला यादव यांची चौकशी करत आहेत.

वृत्तानुसार, पाटणा आणि दरभंगा येथील भोला यादव यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. 2004 ते 2009 दरम्यान, लालू यादव रेल्वेमंत्री असताना भोला यादव हे त्यांचे ओएसडी होते. त्यावेळी रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या मिळवून देऊ असे सांगण्यात आले होते. भोला यादव हे या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत.

लालू यादव यांच्या कुटुंबियांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले

सीबीआयने दोन महिन्यांपूर्वी या प्रकरणी लालू यादव यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. सीबीआयचे पथक लालू प्रसाद यादव यांच्या पाटणा येथील राबरी निवासस्थान आणि दिल्लीतील (Delhi) मीसा भारती यांच्या घरासह अनेक ठिकाणी पोहोचले होते. पथकाने अनेक तास घरांची झडती घेतली होती.

अलीकडेच, सीबीआयने लालूंचे निकटवर्तीय भोला यादव यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आता भोला यादव यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत. यामुळे लालू यादव यांच्या अडचणीही वाढू शकतात.

काय प्रकरण आहे?

सीबीआयने (CBI) तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), त्यांची पत्नी राबडी देवी, दोन मुली, एक नोकरशहा आणि काही खासगी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता. लालू यादव हे रेल्वेमंत्री असताना रेल्वेमध्ये ग्रुप डीच्या पदांवर लोकांना नोकऱ्या दिल्या जात होत्या, त्या बदल्यात लालू कुटुंबीयांच्या नावावर जमीन करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या पदांच्या भरतीसाठी रेल्वेने कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचे तपासातून समोर आले आहे. या कथित घोटाळ्यात लालू कुटुंबातील लोकांना त्यांच्या नावावर एक लाख चौरस फुटांपेक्षा जास्त जमीन मिळाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT