Lalu Yadav News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजदचे सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. लालू प्रसाद यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी पाटणा येथील राबरी निवासस्थानी पायऱ्यांवरुन उतरत असताना लालू प्रसाद यादव पडले. त्यामुळे त्यांच्या कंबरेला आणि खांद्याला दुखापत झाली. लालू यादव यांच्या उजव्या खांद्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर रविवारी रात्री त्यांची तब्येत अचानक बिघडली आणि सोमवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) 10 सर्कुलर रोड येथील राबडी देवी यांच्या शासकीय निवासस्थानी पडले. यानंतर त्यांना तात्काळ पाटणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे लालूंच्या खांद्याला किरकोळ फ्रॅक्चर झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याच दिवशी उशिरा त्यांची तब्येत इतकी बिघडली की, त्यांना सोमवारी पहाटे पाटण्यातील बेली रोडवरील एका खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करावे लागले. त्यांना अनेक आजार आहेत.
त्याचवेळी, लालू यादव यांच्या प्रकृतीबाबत राष्ट्रीय जनता दलाचे कार्यकर्तेही चिंतेत आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक नेतेही रुग्णालयात पोहोचत आहेत. मंगळवारी संध्याकाळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यासह अनेक नेते लालू प्रसाद यांच्या तब्येतची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. सोमवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि जमुईचे खासदार चिराग पासवान यांच्यासह अनेक नेत्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या तब्येतची विचारपूस केली. यावेळी लालू यादव यांची दोन्ही मुले तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव रुग्णालयात उपस्थित होते.
लालू किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला जात होते
75 वर्षीय लालू प्रसाद यांना किडनी इन्फेक्शन, फुफ्फुसात पाणी राहणे आणि रक्तदाब यांसह अनेक आजार आहेत. त्यांना किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा होता. यासाठी नुकताच न्यायालयाने त्यांचा पासपोर्ट जारी केला आहे. त्याचवेळी लालू यादव सध्या पाटणा येथील रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांचा एमआरआय स्कॅनही करण्यात आला आहे. मात्र, डॉक्टरांना त्यांच्या किडनीची चिंता आहे, त्यासाठी त्यांना दिल्लीलाही पाठवले जाऊ शकते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.