India vs South Africa Test Series: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या घोषणेतील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाब म्हणजे, स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) याचे अपघातानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले. या मालिकेतील पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जाईल.
बीसीसीआयने (BCCI) या कसोटी मालिकेसाठी नेतृत्वाची धुरा युवा खेळाडूंवरच कायम ठेवली आहे. संघनायकपदाची जबाबदारी पुन्हा एकदा आश्वासक फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) याच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतला थेट संघाचा उपकर्णधार (Vice-Captain) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतचे मैदानावर परतणे आणि त्याला लगेच उप-कर्णधारपदाची जबाबदारी मिळणे, हे त्याचे संघातील महत्त्व अधोरेखित करते.
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची मालिका घरच्या मैदानावर खेळली होती. त्या मालिकेत संघाने शानदार कामगिरी केली होती. त्या मालिकेनंतर संघात दोन बदल करण्यात आले. इंग्लंड मालिकेदरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली त्यामुळे तो संघाबाहेर होता. या काळात ध्रुव जुरेलने यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळली. एन. जगदीशनलाही बॅकअप कीपर म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले होते. मात्र आता जगदीशनच्या जागी पंत संघात परतला. यष्टीरक्षक म्हणून पंत हाच प्रमुख पर्याय असेल. तर ध्रुव जुरेलला फलंदाज म्हणून संधी दिली जाऊ शकते.
तसेच, बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आणखी एक बदल करण्यात आला आहे. यावेळी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा याला संघातून वगळण्यात आले. त्याच्या जागी आकाश दीपला संधी देण्यात आली. प्रसिद्ध सध्या भारत अ संघाचा भाग आहे, त्यामुळे त्याला या संघात निवडण्यात आलेले नाही. उर्वरित संघ मागील वेस्ट इंडिज मालिकेत होता तसाच आहे. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल पुन्हा एकदा सलामी जोडी म्हणून दिसतील. तर आकाश दीप मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यासोबत वेगवान गोलंदाजी करताना दिसेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेचा पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल. दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतर्गत होणार आहे, ज्यामुळे ती एक महत्त्वाची मालिका बनली आहे. भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दोन्ही सामने जिंकून त्यांचा पीसीटी वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडिया: शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.