IPL 2025
क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जचा पराभव करून आरसीबी आता आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आरसीबीने चार वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पण आजपर्यंत संघाला जेतेपद जिंकता आलेले नाही. अशा परिस्थितीत, यावेळी संघाकडे प्रथमच जेतेपद जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
आयपीएलच्या अंतिम सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू आर. अश्विनच्या विधानामुळे आरसीबीचे चाहते थोडे घाबरले आहेत. आरसीबीनं मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत येऊ नये म्हणून प्रार्थना करावी अन्यथा त्यांना जेतेपद जिंकणे कठीण होईल, असं अश्विनचं मत आहे.
यूट्यूब चॅनलवर बोलताना अश्विनने म्हणाला की, आरसीबीला आयपीएल किताब जिंकायचे असेल तर गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सविरुद्ध जिंकावे लागेल. मुंबई इंडियन्स हा तगडा संघ आहे. या संघाला तुम्ही अंतिम फेरीत प्रवेश देऊ शकत नाही.
तुम्हाला त्यांना कोणत्याही किंमतीत रोखावं लागेल. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे जो अंतिम सामन्यात आला तर आरसीबीला किताब जिंकणं कठीम होईल. जर मी आरसीबीमध्ये असतो तर मला गुजरात टायटन्सचा सामना करायला आवडेल.
आयपीएल २०२५ चा एलिमिनेटर सामना आज संध्याकाळी ७:३० वाजता मुल्लानपूर येथे मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्जशी सामना करेल, कारण क्वालिफायर १ मध्ये पंजाब किंग्जला ८ विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.
क्वालिफायर १ मध्ये आरसीबीची अप्रतिम गोलंदाजी दिसून आली. त्यामुळे पंजाब किंग्जचा संघ फक्त १०१ धावांवर आटोपला. त्यानंतर, आरसीबीने १० षटकांत २ गडी गमावून हे लक्ष्य गाठले आणि ९ वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.