Rakesh Tikait warns central government for farmer protest
Rakesh Tikait warns central government for farmer protest  Dainik Gomantak
देश

'जर शेतकऱ्यांना जबरदस्तीने सीमेवरून हटवण्याचा प्रयत्न तर याद राखा' राकेश टिकैतांचा मोदी सरकारला इशारा

दैनिक गोमन्तक

केंद्राने लागू केलेल्या तीन केंद्रीय कृषी कायद्यांच्या (Farmers Law) विरोधात दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे (Farmer Protest). या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भारतीय किसान युनियनचे (BKU) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत (Rakesh Tikait) हे सातत्याने केंद्र सरकारवर (Central Government) टीका करताना दिसत आहेत. राकेश टिकैत यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे- 'केंद्र सरकारकडे 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे, त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून गावातील शेतकरी ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीमेवर पोहोचतील आणि आंदोलनस्थळी आंदोलन मजबूत करतील.'असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे . (Rakesh Tikait warns central government for farmer protest)

येत्या 27 नोव्हेंबरला शेतकरी आंदोलनाला 11 महिने पूर्ण होत आहेत. त्याचवेळी प्रशासन जेसीबीच्या सहाय्याने मंडप उखडण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप राकेश टिकैत यांनी केले होते.त्याचबरोबर त्यांनी प्रशासन इथून तंबू उपटणार असेल तर शेतकरी सरकारी कार्यालयाबाहेर तंबू ठोकतील असे देखील राकेश टिकैत यांनी सांगितले आहे. दिल्ली-यूपीच्या गाझीपूर सीमेवर दिल्ली पोलिसांनी मार्ग मोकळा करण्यासाठी बॅरिकेड हटवण्यास सुरूवात केली आहे त्याच अनुषंगाने त्यांनी हा इशारा दिला आहे.

राकेश टिकैत यांनी रविवारी सकाळीच धमकीचे ट्विट केले होते ज्यात - 'जर शेतकऱ्यांना जबरदस्तीने सीमेवरून हटवण्याचा प्रयत्न झाला, तर देशभरातील सरकारी कार्यालयांना गल्ला मंडई बनवण्यात येईल.' आता राकेश टिकैत यांच्या या ट्विटमुळे चर्चेला उधाण आले आहे . लोकांनी बाजूने आणि विरोधात आपले मत लिहून रिट्विट केले. या दरम्यान राकेश टिकैत यांच्या विरोधात लिहिणाऱ्यांची संख्या जास्त होती हेही महत्वाचे आहे.

दरम्यान 29 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी यूपी गेट फ्लायओव्हरवरील बॅरिकेड हटवल्यानंतर रस्ता खुला झाल्याची अफवा लोकांमध्ये पसरली होती पण प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. सीमेवर आंदोलकांचा निषेध नेहमीप्रमाणे सुरूच आहे. त्यांच्या संमतीशिवाय कोणीही येथून जाऊ शकत नाही. भारतीय किसान युनियनने देखील यूपी गेटवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रविवारी दुपारी यूपी गेट उड्डाणपुलाखाली बांधलेली आंदोलकांची चेकपोस्ट रिकामी होती. त्यामुळे काही दुचाकी चालक तेथून महामार्गावर पोहोचले. इकडे दिल्ली पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्यात आले, त्यामुळे ते दिल्लीला गेले. यामुळे आंदोलकांनी ये-जा करणाऱ्यांना रोखले नाही तर ते यूपी गेटमार्गे दिल्लीला जाऊ शकतात, हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे .

28 नोव्हेंबर 2020 पासून तिन्ही कृषी कायद्यांविरोधातदिल्लीत आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग-नऊ, सर्व्हिस रोड आणि उड्डाणपुलाखाली तंबू टाकून कब्जा केला आहे. आणि आणखीनही तो तसाच आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT