समाजवादी पक्षाचे (Sawajwadi Party) राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी समाजवादी विजय रथ हा उपक्रम हाती घेतला आहे. याच विजयी रथाच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल केला आहे. जाहीर सभेला संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, सरदार पटेल, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि जिना यांनी एकाच संस्थेत शिक्षण घेतले. ते बॅरिस्टर झाले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी एका विचारधारेवर RSS ला बंदी घातली होती. (Akhilesh Yadav big statement on Muhammad Ali Jinnah)
अखिलेश यादव म्हणाले की, सपा नेत्यांविरोधात ईडी आणि सीबीआय तपास काँग्रेस आणि भाजपमुळेच आहे. देशातील काँग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक नाही. यावेळी अखिलेश यादव यांनी काँग्रेसला भाजप आणि भाजपला काँग्रेस म्हटलं आहे . अखिलेश म्हणाले की, ब्रिटिशांनी सर्वप्रथम भारतीयांमध्ये चहा पिण्याची सवय लावली, त्यामुळे भारतीयांना गुलामगिरी करावी लागली. तसेच भाजप मोफत सिलिंडर वाटून लोकांची सवय बिघडवत असल्याचा आरोप देखील त्यांनी भाजप सरकारवर केला आहे.
अखिलेश यादव म्हणाले की, 2000 च्या नोटेने रुपया काळा आणि पांढरा होत नाही, व्यवहार होतात. नोटाबंदीच्या वेळी भाजप म्हणायचे की भ्रष्टाचार संपेल. पण आता पैसे घेणे बंद झाले आहे का? नवीन लाल नोट छापून नव्या पद्धतीने भ्रष्टाचार सुरू झाला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे वर्णन करताना देखील अखिलेश यादव यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तसेच भाजप नेते सरदार पटेलांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे सांगतात, पण आज शेतकरी अडचणीत असून त्याचे उत्पन्न दुप्पट होत नाही. यूपीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट आहे, त्यामुळे यूपीच्या जनतेने भाजपला सत्तेतून हटवण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील अखिलेश यादव यांनी सांगितले आहे.
सरदार पटेलांच्या बहाण्याने अखिलेश यादव यांना जिना आठवले. जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, सरदार पटेल, राष्ट्रपिता महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जिना हे याच संस्थेत शिकून बॅरिस्टर म्हणून आले होते. त्याच ठिकाणी अभ्यास केला. त्या साऱ्यांनी देशात स्वातंत्र्य आणले.त्याला मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागले पण ते मागे हटले नाहीत.RSS ही एक दुष्ट विचारधारा ज्यावर बंदी घालण्यात आली होती, त्यावर कोणी बंदी घातली असेल तर सरदार पटेलांनी बंदी घातली होती. जे आज देशाविषयी बोलत आहेत ते जात-पात आणि धर्मात विभागल्याबद्दल बोलत आहेत. आपल्या देशाची जगातील सर्वात मोठी ओळख ही आहे की येथे विविध जाती-धर्माचे लोक एकत्र राहण्याचे काम करतात. म्हणूनच या दिवशी आपण सरदार पटेल यांचे स्मरण करत आहोत, ज्यांनी देशाला एकसंघ केले, संस्थानांचे उच्चाटन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.