Rajnath Singh  Dainik Gomantak
देश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोनाच्या विळख्यात

राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे

दैनिक गोमन्तक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते होम क्वारंटाईन आहेत. भाजपच्या 70 वर्षीय ज्येष्ठ नेत्याने सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. संरक्षणमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले की, मला आज सौम्य लक्षणांसह कोरोना (covid-19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतःला वेगळे करून तपासणी करून घ्यावी अस आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.

राजधानी दिल्लीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. रविवारी, 24 तासांत संसर्गाची 22,751 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 60,733 झाली आहे. सुमारे साडेसात महिन्यांतील हे सर्वात सक्रिय प्रकरण आहे. दिल्लीतील सकारात्मकता दर 23.53% पर्यंत वाढला आहे. देशात 1.79 लाख रुग्ण आढळले भारतात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूचे 1,79,723 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 44,388 प्रकरणे नोंदली गेली आहेत. या दरम्यान 146 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये 24,287, दिल्लीत 22,751, तामिळनाडूमध्ये 12,895, कर्नाटकात 12 हजार रुग्ण आढळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Best Cruiser Bike: स्वस्तात 'दमदार' क्रूझर! Harley-Davidson आणि Royal Enfield मध्ये बेस्ट बाईक कोणती? फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

Video: वय 50, एका स्टाईलवर लाखो मुली फिदा, तरीही अक्षय खन्ना एकटा; म्हणाला, 'बायकोची जबाबदारी घेण्यापेक्षा...'

SDMA Advisory: 25 बळींच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकार सतर्क; नाईट क्लब्स, बार्स, रेस्टॉरंट्ससाठी 'गाइडलाइन्स' जारी

क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी! स्टार खेळाडूनं निवृत्ती मागे घेतली, T-20 आणि कसोटीतही खेळणार

'या दुःखद घटनेने मन हेलावले', हडफडे नाईटक्लब प्रकरणानंतर मालकाची पहिली प्रतिक्रिया; कोण आहे हा सौरभ लुथरा?

SCROLL FOR NEXT