Rajiv Gandhi  Dainik Gomantak
देश

Supreme Court: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार सुटका, 6 दोषींना सोडण्याचे SC ने दिले आदेश

Rajiv Gandhi Assassination Case: या दोषींमध्ये नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस यांचा समावेश आहे.

दैनिक गोमन्तक

Rajiv Gandhi Assassination: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील 6 दोषींची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या दोषींमध्ये नलिनी, रविचंद्रन, मुरुगन, संथन, जयकुमार आणि रॉबर्ट पॉयस यांचा समावेश आहे. यापूर्वी 17 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एका दोषी पेरारीवलनला सोडण्याचे आदेश दिले होते. उर्वरित दोषींनीही याच आदेशाचा हवाला देत न्यायालयाकडे सुटकेची मागणी केली होती.

राज्यपाल राज्य सरकारची शिफारस स्वीकारण्यास बांधील

न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती नागरथना यांच्या खंडपीठाने सांगितले की, तामिळनाडू सरकारने या दोषींच्या सुटकेसाठी राज्यपालांकडे शिफारस पाठवली होती, परंतु राज्यपालांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पेरारिवलन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना राज्य सरकारची शिफारस मान्य करण्यास बांधील असल्याचे सांगितले.

दुसरीकडे, दोषींच्या सुटकेबाबत निर्णय घेण्यास राज्यपालांकडून अवास्तव विलंब झाला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने कलम 142 अंतर्गत बहाल केलेल्या विशेष अधिकारांचा वापर करुन पेरारिवलनची सुटका करण्याचे आदेश दिले. पेरारिवलन प्रकरणात दिलेला आदेश या दोषींनाही लागू असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांनाही तातडीने सोडण्यात यावे.

कारागृहातील दोषींची चांगली वागणूक

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, 'दोषींनी 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला आहे. तुरुंगात त्यांची वागणूक चांगली आहे. उदाहरणार्थ, रॉबर्ट पॉईस याने अनेक रोगांशी लढा देत पदवी मिळवली. तर जयकुमारने तुरुंगातही शिक्षण घेतले. संथनने अनेक रोगांशी लढणारे लेख लिहिले, त्यामुळे त्याला बक्षीसही मिळाले. नलिनी, रविचंद्रन, मुरुगन यांचीही तुरुंगात चांगली वागणूक होती. तीस वर्षांहून अधिक काळ ते तुरुंगात आहेत. या काळात त्यांनी शिक्षण घेतले.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT