Biparjoy in Rajasthan Dainik GOmantak
देश

Biparjoy in Rajasthan: बिपरजॉयचा आता राजस्थानात धुडघूस! 500 गांवांची बत्ती गुल, हजारो संसार रस्त्यावर

गुजरातमध्ये प्रचंड विध्वंस केल्यानंतर, बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव राजस्थानमध्येही दिसून येत आहे..

Ashutosh Masgaunde

गुजरातनंतर बिपरजॉय चक्रीवादळ राजस्थानमध्ये पोहोचले आहे. वादळामुळे राजस्थानच्या अनेक भागात हाहाकार उडाला आहे. गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे बारमेर जिल्ह्यात कहर झाला असून अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो नागरिकांना आपली घरे सोडावी लागली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा कहर म्हणजे राज्यातील 500 हून अधिक गावांमध्ये वीज नाही. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गावांमध्ये शेकडो कच्च्या घरांची पडझड झाली असून अनेक भागात ५ ते ७ फूट पाणी घरांमध्ये शिरले आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या विध्वंसामुळे एनडीआरएफ-एसडीआरएफच्या पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. येत्या १२ तासांत येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. IMD ने बाडमेर, जालोर आणि सिरोहीमध्ये 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पाली आणि जोधपूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

रेल्वेने गाड्या रद्द केल्या

बिपरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) झोनमध्ये रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. रेल्वेने अमृतसर-गांधीधाम एक्सप्रेस, जोधपूर-भिलडी एक्सप्रेस, वलसाड-भिलडी एक्सप्रेस, जोधपूर-पालनपूर एक्सप्रेस, जोधपूर-पालनपूर एक्सप्रेस, बारमेर-मुनाबाव एक्सप्रेस, मुनाबाव-बाडमेर एक्सप्रेस यासह 13 गाड्या रद्द केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे सर्वाधिक समस्या बारमेरमध्ये झाल्या आहेत. संपूर्ण पावसाळ्यात बारमेरमध्ये सुमारे 250 MM पाऊस पडत असतो. मात्र, या वदळामुळे गेल्या 24 तासात 1266 MM पाऊस झाला आहे. बाडमेरच्या चौहान येथे सर्वाधिक २६२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे आता जिल्ह्यात पुराचा धोका निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ग्रामीण भागात अनेक कच्च्या घरांची पडझड झाली आहे, अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी संजीव कुमार खेदार यांनी सांगितले की, बिपरजॉय शुक्रवारी रात्री उशिरा राजस्थानमध्ये दाखल झाला होता. प्रशासनाची वेगवेगळी पथके सज्ज आहेत. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे.

'बिपरजॉय' नाव कसे पडले

चक्रीवादळांची नावे अतिशय विचित्र असतात. वेगवेगळे देश त्याचे नाव ठेवतात. बांगलादेशने या चक्रीवादळाला बिपरजॉय असे नाव दिले आहे. बंगालीमध्ये बिपरजॉय म्हणजे विनाशक. जागतिक हवामान संघटनेचे सदस्य देश चक्री वादळांना नावे देतात. UN च्या आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर आशिया आणि पॅसिफिक (ESCAP) पॅनेलचे 13 सदस्य देश उत्तर हिंद महासागरातील वादळांची नावे ठरवतात.

13 देशांच्या पॅनेलमध्ये भारत, पाकिस्तान, ओमान, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, मालदीव, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, येमेन यांचा समावेश आहे. यावेळी बांगलादेशकडे वादळाच्या नावाची जबाबदारी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT