Cyclone Biporjoy in Gujrat: बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात धडकले असून, वादळाचे परिणाम दिसायला सुरू झाले आहेत. चक्रीवादळामुळे कच्छ आणि सौराष्ट्र किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला, त्यामुळे बचाव संस्थांना सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, चक्रीवादळ कच्छ आणि देवभूमी द्वारका जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर भूभागावर प्रभाव पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. मध्यरात्रीपर्यंत ते पूर्ण होईल.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले की, चक्रीवादळ बिपरजॉय किनारपट्टीवर धडकल्यानंतर जोरदार वाऱ्यामुळे देवभूमी द्वारका जिल्ह्यात झाडे उन्मळून पडली, ज्यात तीन जण जखमी झाले
भावनगर जिल्ह्यात पुरात अडकलेल्या शेळ्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या 55 वर्षीय व्यक्तीचे नाव रामजी परमार तर मुलाचे नाव राकेश परमार असे आहे.
देवभूमी द्वारका येथे झाडे पडल्याने तीन जण जखमी झाले आहेत. वादळ सध्या 13-14 किमी वेगाने पुढे सरकत आहे. वादळामुळे आज कच्छ, द्वारका आणि जामनगरमध्येही जोरदार वाऱ्यासह पाऊस पडेल.
2. IMD च्या अहमदाबाद युनिटच्या संचालक मनोरमा मोहंती यांनी सांगितले की, चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊनही शुक्रवारी जोरदार वारे वाहतील.
3. एनडीआरएफच्या 15 तुकड्या आणि एसडीआरएफच्या 12 तुकड्यांव्यतिरिक्त, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, भारतीय तटरक्षक दल आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) च्या जवानांना मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
4. सैन्याने भुज, जामनगर, गांधीधाम तसेच नलिया, द्वारका आणि मांडवी येथे 27 मदत पथके तैनात केली आहेत. हवाई दलाने वडोदरा, अहमदाबाद आणि दिल्ली येथे प्रत्येकी एक हेलिकॉप्टर तयार ठेवले आहे. नौदलाने बचाव आणि मदतीसाठी ओखा, पोरबंदर आणि बकासूर येथे प्रत्येकी पाच गोताखोर आणि उत्तम जलतरणपटूंचा समावेश असलेल्या १०-१५ टीम्स तैनात केल्या आहेत.
5. आतापर्यंत स्थलांतरित झालेल्या 94,427 लोकांपैकी कच्छ जिल्ह्याती 46,800, देवभूमी द्वारकामधील 10,749, जामनगरमधील 9,942, मोरबीमधील 9,243, राजकोटमधील 6,822, जुनागढमधील 4,864, पोरबंदरमधील 4379 तर गिर सोमनाथ जिल्ह्यातील 1065 नागरिकांचा समावेश आहे.
6. कच्छ जिल्ह्यातील जखाऊ आणि मांडवी शहरांजवळ अनेक झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले, तर घराच्या बांधकामात वापरल्या जाणारे पत्रे उडून गेली.
7. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून ७६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर ३६ गाड्या मधेच थांबवण्यात आल्या आहेत. अशात फक्त ३१ निवडक स्थानकांवर गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.