Cyclone Biperjoy: ‘बिपरजॉय’मुळे हजार गावे अंधारात!

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातेतील जखाऊ बंदराजवळ धडकले.
Biparjoy Cyclone
Biparjoy CycloneDainik Gomantak
Published on
Updated on

Cyclone Biperjoy गुजरातेतील कच्छ-सौराष्ट्र भागाला तडाखा देणाऱ्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे विजेचे सुमारे ५,१२० खांब कोसळले. त्यामुळे तब्बल साडेचार हजार गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला.

त्यापैकी साडेतीन हजार गावांतील वीजपुरवठा पूर्ववत केला असून अद्याप एक हजार गावे अंधारात आहेत. या चक्रीवादळामुळे सुमारे ६०० वृक्ष उन्मळून पडले. त्याचप्रमाणे, तीन राज्य महामार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. अनेक घरांचेही नुकसान झाले आहे.

Biparjoy Cyclone
Ministry of Skill Development: तरुणांनो, प्रशिक्षणार्थी योजनेचा लाभ घ्‍या!- सावंत

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुरुवारी (ता. १५) संध्याकाळी साडेसहा वा. गुजरातेतील जखाऊ बंदराजवळ धडकले. रात्री अडीचपर्यंत वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरू होती. सुमारे १४० कि.मी. प्रतितास वेगाने वाहणारे वारे वाहत होते.

आठवडाभरानंतर मॉन्सून सक्रिय

पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा शुक्रवारपासून (ता. १६) प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरच मॉन्सूनच्या पुढच्या वाटचालीसंबंधी समाधानकारक बातमी मिळण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळ निवळल्यानंतर १८ ते २१ जूनदरम्यान दक्षिण द्वीपकल्प व पूर्व भारताच्या आणखी काही भागांत मॉन्सूनची प्रगती होण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे महाराष्ट्रात आठवडाभर तरी मॉन्सूनच्या जोरदार पावसाची शक्यता नाही. गोव्यात पुढील दाेन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com