Rajasthan Police
Rajasthan Police Twitter
देश

Rajasthan: विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने बेदम मारहाण, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू

दैनिक गोमन्तक

Rajasthan Child Death: राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात शिक्षकाच्या मारहाणीमुळे एका बहुजन विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षकाने 9 वर्षांच्या बहुजन समाजातील मुलाला मडक्यातील पाणी प्यायल्याने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचवेळी विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जालोरमध्ये तणाव पसरला असून, त्या भागात 24 तास इंटरनेट बंद करण्यात आले आहे. या मुलाच्या मृत्यूवरून राज्यातही राजकारण सुरू झाले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी गेहलोत सरकारवर जोरदार निशाणा साधला.

मारहाणीमुळे विद्यार्थ्याला अंतर्गत जखमा झाल्या. अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबीयांनी त्याला प्रथम स्थानिक रुग्णालयात दाखल केले, नंतर त्याला अहमदाबादला नेले, तेथे त्याचा मृत्यू झाला. इंद्र कुमार असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिरात इयत्ता तिसरीत शिकत होता. या संपूर्ण प्रकरणी मृत विद्यार्थ्याचे काका किशोर कुमार यांनी सायला पोलीस ठाण्यात शाळेचा संचालक छैल सिंग याच्याविरुद्ध मारहाण, जातीवाचक शब्द वापरणे, अपमानित करून विद्यार्थ्याची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

त्याचवेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट केले की, 'शिक्षकाच्या या कृत्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू दुःखद आहे. खून आणि एससी/एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. जलद तपास आणि शिक्षेसाठी हे प्रकरण अधिकारी योजनेंतर्गत घेण्यात आले आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.'

मारहाणीमुळे मुलाच्या कानाची नस तुटली

खरे तर प्रकरण जालोर जिल्ह्यातील सायला उपविभागातील सुराणा गावचे आहे. 20 जुलै रोजी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत शिकणाऱ्या एका बहुजन समाजाच्या मुलाने पाणी पिण्यासाठी शिक्षकाच्या माठाचा वापर केला. या माठाला मुलाने हात लावल्यामुळे शिक्षक छैल सिंगने त्याला मारहाण केली होती. तसेच त्यांने मुलाचा जातीवाचक शब्दांत अपमान केल्याचा आरोप आहे. आजपर्यंतच्या अहवालानुसार या मारहाणीमुळे मुलाच्या कानाची नस तुटली होती. यानंतर त्यांना उपचारासाठी उदयपूरला पाठवण्यात आले आणि तेथून मुलाला अहमदाबादला रेफर करण्यात आले. त्याचवेळी शनिवारी सायंकाळी चार वाजता या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

शिक्षण विभागाने चौकशी समिती स्थापन केली

त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास जालोर सीओकडे सोपवण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. यासोबतच शिक्षण विभागाने चौकशी समितीही स्थापन केली आहे. जालोरचे एसपी हर्षवर्धन अग्रवाल यांनीही मृताच्या घरी जाऊन घटनेची माहिती घेतली आहे. या मुलाच्या मृत्यूनंतर राजस्थानमध्येही राजकारण सुरू झाले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ ​​रावण यांनी ट्विट केले की, 'स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही एका दलित मुलाला जातीवादाचे बळी व्हावे लागले. पाण्याच्या भांड्याला हात लावण्याचेही स्वातंत्र्य नाही, मग स्वातंत्र्याच्या खोट्या घोषणा कशाला मारत आहोत?'

भाजप खासदारावर हल्लाबोल

या प्रकरणी राजसमंद येथील भाजप खासदार दिया कुमारी यांनी ट्विट केले की, काँग्रेसच्या राजवटीत राजस्थानमध्ये शिक्षणाचे मंदिर जातिभेद आणि अत्याचाराचे केंद्र बनले आहे हे अत्यंत दुःखद आहे. राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका शिक्षकाने एका निष्पाप मुलाला पाणी पिऊन मृत्यूची शिक्षा दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. एससी आयोगाचे अध्यक्ष खिलाडी लाल बैरवा यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 15 ऑगस्टला जालोरच्या सुराणा गावात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बैरवा तेथे पीडित मुलाच्या नातेवाईकांना भेटणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

SCROLL FOR NEXT