Karnataka: फॅमिली कोर्टातच पतीने पत्नीचा गळा चिरुन केली हत्या, जाणून घ्या कारण

Family Court: कर्नाटकातील फॅमिली कोर्टातून शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime
CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Crime: कर्नाटकातील फॅमिली कोर्टातून शनिवारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने कोर्टातच पत्नीचा गळा चिरुन खून केला.

दरम्यान, नरसीपुरा येथील फॅमिली कोर्टात या दाम्पत्यातील वाद मिटवण्यासाठी सुनावणी सुरु होती. जिथे चैत्रा (28) आणि शिवकुमार (32) हे देखील उपस्थित होते. पोलिस अधीक्षक आर श्रीनिवास गौडा यांनी माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने (Court) या जोडप्याला पुढील सुनावणीची तारीख दिली.

Crime
'अपघातात पालकांचा मृत्यू झाल्यास विवाहित मुलींनाही भरपाई मिळावी': Karnataka HC

दुसरीकडे, तासाभराच्या समुपदेशनानंतर चैत्रा वॉशरुमला गेली असता पती शिवकुमारने चाकूने तिच्या मान कापली, असे पोलीस अधीक्षक गौडा यांनी सांगितले. त्यानंतर चैत्राला तात्काळ रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी (Doctors) तिला मृत घोषित केले. पोलिसांनी (Police) शिवकुमारला ताब्यात घेतले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे." त्याने कोर्टात चाकू कसा आणला आणि त्याची योजना कशी आखली याचाही तपास करु.''

Crime
Karnataka: आईनेच घेतला चार वर्षाच्या चिमुरडीचा जीव, कारण ऐकून थक्क व्हाल

त्यांच्या म्हणण्यानुसार, याआधीही शिवकुमार याच्यावर घरगुती हिंसाचाराचा एफआयआर नोंदवण्यात आला होता आणि या संदर्भात पती-पत्नीला सौहार्दपूर्ण राहण्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु दोघेही ते मान्य करायला तयार नव्हते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com