India Flood News Dainik Gomantak
देश

India Flood News: उत्तर, पूर्व भारतात पावसाचा कहर, अतिवृष्टीमुळे 50 नागरिकांचा मृत्यू

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर आणि पूर्व भारतात पावसाने कहर घातला आहे, मुसळधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत 50 हून अधिक लोक मरण पावले आहेत. अतिवृष्टीमुळे पूर, भूस्खलन आणि घरांची पडझड झाली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, झारखंडमध्ये 50 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. मृतांमध्ये 22 लोक एकट्या हिमाचल प्रदेशातील आहेत. उत्तराखंड-ओडिशामध्ये प्रत्येकी चार जणांचा मृत्यू झाला असून झारखंडमध्येही एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशात, गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे भूस्खलन, पूर आणि ढगफुटीच्या घटनांमध्ये किमान 22 जणांनी आपला जीव गमावला आहे. मृतांपैकी आठ जण एकाच कुटुंबातील आहेत. राज्यात अचानक झालेल्या या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत.

हिमाचल राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेश कुमार मोख्ता यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे मंडी, कांगडा आणि चंबा जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या 24 तासांत हवामानाशी संबंधित 36 घटनांची नोंद झाली आहे. मंडीतील मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्ग आणि शोघीमधील शिमला-चंदीगड महामार्गासह 743 रस्ते पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

मंडी जिल्ह्याच्या उपायुक्तांनी सांगितले की, एकट्या मंडी जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला तर सहा जण बेपत्ता झाले. राज्यातील कांगडा येथील चक्की पूल शनिवारी मुसळधार पावसामुळे कोसळल्याने पठाणकोट आणि जोगिंदरनगर दरम्यानची रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

पूर्व भारतातील काही भागात पावसाचा परिणाम झाला असून, ओडिशातील महानदी पुराच्या विळख्यात आहे आणि सुमारे 4 लाख लोक 500 गावांमध्ये अडकले आहेत. तसेच, चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर शेजारच्या झारखंडमध्ये एकाचा मृत्यू झालाय. ओडिसाला पावसाचा अधिक फटका बसला असून त्याच्या उत्तरेकडील भागात शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भुवनेश्वरच्या बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

उत्तराखंडमध्ये, शनिवारी ढगफुटीच्या विविध घटनांमध्ये किमान चार जण ठार झाले, तर 10 बेपत्ता झाले. पावसामुळे तटबंधी कोसळली, पूल वाहून गेले आणि घरांमध्ये चिखल आणि पाणी साचले. यामुळे अनेक गावांतील लोकांना स्थलांतर करावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:मंत्री माविनचे 'सांबा', 'कालिया' काय करतात हे त्यांना माहित नाही"

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

Starlink in india: एलन मस्क यांच्या कंपनीला भारतात ब्रेक! स्टारलिंकला फक्त 20 लाख कनेक्शनना परवानगी

Mumbai Goa Highway Traffic: LPG गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळला! मुंबई-गोवा महामार्गावर 10 तासांपासून वाहतूक ठप्प

Kokedama: नारळाच्या काथ्यापासून विघटनशील, जपानी 'कोकेडामा' बनवणारी गोमंतकीय कलाकार 'लेखणी'

SCROLL FOR NEXT