श्री बोडगेश्वर संस्थान आमसभेत गैरव्यवहारांचे आरोप-प्रत्यारोप

आमसभा दुसऱ्यावेळी स्थगित करण्याची नामुष्की
Bodgeshwar  Mapusa
Bodgeshwar Mapusa Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर संस्थानाची रविवारी झालेली आमसभा कथित प्रचंड गदारोळामुळे दुसऱ्यावेळी स्थगित करण्याची नामुष्की कार्यकारी समितीवर ओढवली. तसेच समितीने सभेस संरक्षण देण्यासाठी पोलिसांना चोलावल्याने माजी अध्यक्ष तथा महाजन अॅड. महेश राजे यांनी याचा निषेध केला आहे.

(Bodgeshwar Sansthan mapusa Allegations of malfeasance in the General Assembly)

Bodgeshwar  Mapusa
Goa Corona Update: गोव्यातील कोरोना बाधितांची संख्या अडीच लाख, आज 115 नवे रूग्ण

आनंद भाईडकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीने मागील तीन वर्षाचा हिशेब अधिकृत सीएकडून सादर केलेला नाही. त्यास महाजनांची मंजुरी न घेताच, लाखो रुपयांचा खर्च केला आहे . देवस्थानात पैशांचा कथित गैरव्यवहार होत असल्याचा आरोप काही महाजनांनी केला. याशिवाय समितीने सादर केलेल्या खर्चास तसेच कथित अंदाजपत्रकास मंजुरी देण्यास आजच्या आमसभेत विरोध झाला. त्यामुळे अध्यक्ष भाईडकर यांना आमसभा दुसऱ्या स्थगित केली.

Bodgeshwar  Mapusa
Rajesh Phaldesai: गोवा डेअरीला लालफितीतून बाहेर पडण्यासाठी मदतीची गरज

स्थायी समितीमार्फत चौकशी

अध्यक्ष आनंद भाईंडकर म्हणाले की, काही महाजनांनी आजच्या बैठकीस हरकत घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कार्यकारी समितीचा कारभार व्यवस्थित नाही, असा त्यांचा दावा. त्यामुळे संबंधितांना आश्वासन दिले की, आम्ही गणेश चतुर्थीनंतर एक स्थायी समिती स्थापन करू व त्यांच्यामार्फत चौकशी होईल. त्यानंतर, ऑक्टोबरमध्ये बैठक घेणार असल्याचे भाईडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com