Rain Update IMD declare high alert in Tamil Nadu Kerala heavy rain in two days  Dainik Gomantak
देश

Rain Update: देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर,हवामान विभागाचा हाय अलर्ट

अनेक राज्यांमध्ये सध्या सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय या भागात अतिवृष्टी होत असल्याने हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे

दैनिक गोमन्तक

एकीकडे देशाच्या अनेक भागांत कडाक्याच्या थंडीमुळे लोकांची थरकाप सुरू झाली आहे, तर दुसरीकडे मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असलेल्या अनेक भागात आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडचणी येत आहेत. तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala)आणि पुद्दुचेरीसह (Puducherry) अनेक राज्यांमध्ये सध्या सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय या भागात अतिवृष्टी होत असल्याने हवामान खात्याने अतिमुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे.मुसळधार पावसामुळे नागरिकांना होणारा त्रास पाहता प्रशासन सज्ज झाले आहे. सध्या दक्षिण भारतातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. चेन्नई, तामिळनाडूमध्ये गेल्या काही दिवसांत भरपूर पाऊस झाला असून त्यामुळे लोकांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. (Rain Update IMD declare high alert in Tamil Nadu Kerala heavy rain in two days)

पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शिक्षण मंत्री ए नारायणसामी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की पुद्दुचेरीतील शाळा आणि महाविद्यालये 26 नोव्हेंबर आणि 27 नोव्हेंबर असे दोन दिवस बंद राहतील. याचा अर्थ आज आणि उद्या विद्यार्थ्यांना सुट्टी असेल.

तामिळनाडूच्या अनेक भागात संततधार पाऊस पडत आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळांना सुटी जाहीर केली आहे.

तर दुसरीकडे हवामान विभाग केरळमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने पाच जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. ऑरेंज अलर्ट म्हणजे अति मुसळधार पाऊस तर यलो अलर्ट अतिवृष्टी दर्शवतो. IMD नुसार, तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि अलाप्पुझा, एर्नाकुलम, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि वायनाडमध्ये पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गोंयत कोळसो नाका' आंदोलनाला विरोधी पक्षांची एकजूट! आलेमाव, सरदेसाई अन् परबांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, 'कोळशाच्या मुद्यावर गप्प बसणारे आता...'

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

SCROLL FOR NEXT