RRB NTPC Dainik Gomantak
देश

RRB NTPC: रेल्वे भरती बोर्डाने NTPC उमेदवारांना दिला मोठा दिलासा

जवळपास सर्व मागण्या मान्य, आता एकच परीक्षा होणार...

दैनिक गोमन्तक

RRB NTPC Update: UP निवडणुकीच्या काही दिवस आधी, रेल्वे भर्ती बोर्डाने नाराज उमेदवारांच्या सर्व मागण्या जवळजवळ मान्य केल्या आहेत. ज्यांनी रेल्वे भर्ती बोर्डाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) च्या निकालांबाबत हिंसकपणे विरोध केला होता. यामध्ये आता एकच परीक्षा घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. (Railway Recruitment Board gives great relief to NTPC candidates)

एवढेच नाही तर रेल्वेने गट-डी भरतीसाठी लेव्हल-1 परीक्षा दोन संगणक-आधारित परीक्षांद्वारे (CBT) घेण्याच्या धोरणातही मोठा बदल केला आहे. आता एकच परीक्षा (Railway Exam) होणार आहे असुन. पहिल्या टप्प्यातील निकालातील 'युनिक' उमेदवारांच्या 20 पटीने विद्यार्थी यशस्वी घोषित केले जातील. पहिल्या टप्प्यातील (CBT-1) कामगिरीच्या आधारावर दुसऱ्या टप्प्यातील संगणक आधारित चाचणी (CBT-2) साठी 20 वेळा 'युनिक' उमेदवार निवडले जातील.

पे-बँडनुसार, ही यादी एप्रिल-2022 च्या पहिल्या आठवड्यात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे. पे बँड 6 साठी दुसऱ्या टप्प्यातील CBT परीक्षा मे-2022 मध्ये होईल. इतर पे बँडसाठी परीक्षेची तारीख लवकरच RRB द्वारे जाहीर केली जाईल. यापूर्वी यशस्वी घोषित केलेले उमेदवार CBT साठी पात्र असतील. अतिरिक्त यशस्वी उमेदवारांची यादी रेल्वे (Railway) बोर्ड स्वतंत्रपणे प्रसिद्ध करेल.

NTPC (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी) मध्ये 35,208 पदे आहेत. या परीक्षेसाठी एकूण 1.25 कोटींहून अधिक ऑनलाइन अर्ज आले होते.

RRB ग्रुप D च्या 1.03 लाख पेक्षा जास्त पदांसाठी 1.15 कोटी लोकांनी अर्ज केले होते. 25 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये एनटीपीसीच्या कनिष्ठ लिपिक, ट्रेन असिस्टंट, गार्डसह विविध श्रेणींमध्ये 35,281 पदांसाठी भरती प्रक्रियेच्या निषेधार्थ उमेदवारांनी ट्रेन रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर पोलीस दलाने छोटा बगडा, सलोरी भागातील लॉजमध्ये राहणाऱ्या स्पर्धक विद्यार्थ्यांच्या खोलीचे दार उचकटून विद्यार्थ्यांना (Student) बेदम मारहाण केली आणि विद्यार्थ्यांना बुटाने व चपलाने मारले आणि मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. उमेदवारांच्या तक्रारी ऐकण्यासाठी रेल्वे बोर्डाने देशभर शिबिरांचे आयोजन केले होते.प्रयागराजमध्ये आयोजित या शिबिरात उमेदवारांनी निवेदने देऊन केलेल्या मागण्यांपैकी बहुतांश मागण्या रेल्वे भरती मंडळाने मान्य केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'; अधिकाधिक महिलांना उमेदवारी देण्याचा निर्णय, विधानसभेत महिला संख्या वाढवणार

Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

डिचोली तालुक्यात झेंडूचे मळे केशरी-पिवळ्या फुलांनी बहरले, कृषी खात्याच्या ‘आत्मा’ योजनेला मोठे यश; शेतकऱ्यांच्या मेहनतीला दसऱ्याचे फळ

Asian Para Games 2026: आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची धमाकेदार सुरुवात! 10 मीटर एअर रायफलमध्ये मोना अग्रवालला 'गोल्ड', तर अवनी लेखराला 'सिल्व्हर'

Goa Mining: 'गाव नष्ट होऊ देणार नाही!' होंडा ग्रामसभेत 'सोलये' खाणीचा प्रश्न ऐरणीवर; एनओसी रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार

SCROLL FOR NEXT