RailOne App Launch Dainik Gomantak
देश

Railway App Launch: रेल्वेच्या सर्व सुविधा आता मिळणार एका क्लिकवर, रेल्वेच्या नव्या ॲपबद्दल जाणून घ्या

RailOne App Launch : रेल्वे प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘रेलवन’ ॲपला आजपासून सुरुवात करण्यात आली.

Sameer Amunekar

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांना एकीकृत डिजिटल सेवा देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘रेलवन’ ॲपला आजपासून सुरुवात करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या ॲपचे उद्‍घाटन करण्यात आले आहे.

‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’च्या (सीआरआयएस) चाळिसाव्या स्थापना दिवसाचे औचित्य साधत ‘रेलवन’ ॲपचे उद्‍घाटन करण्यात आले आहे. ‘अँड्रॉइड’ तसेच ‘आयओएस ॲप स्टोअर’वरून ते डाउनलोड करता येईन.

फायदा काय?

  • सर्व सुविधा आता एकाच प्लॅटफॉर्मवर

  • ॲपचे स्वरूप ‘वन स्टॉप सोल्यूशन’

  • आरक्षित, अनारक्षित प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंग

  • तत्काळ अन् प्रिमिअम गाड्यांचे बुकींग शक्य

हे पण दिसेल

  • गाडीचा क्रमांक

  • जागांची उपलब्धता

  • गाडी नेमकी कोठे

  • स्टेशन अलर्ट

  • गाड्यांचे वेळापत्रक

भोजनही मागवा

प्रवासादरम्यान ऑनलाइन जेवण मागवायचे असेल तर ती सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय तक्रारींचा निपटारा, फीडबॅक सिस्टिम, आपत्कालीन मदत ही सेवा त्यात असेन. मालगाड्यांची माहिती, माल बुकिंग आणि ट्रॅकिंगची माहिती लोकांना घेता येणार आहे.

असे करा लॉग-इन : ‘रेल कनेक्ट’ किंवा ‘यूटीएस ऑनलाइन’ या ॲपचा यूजर आयडी वापरून ‘रेलवन’ ॲपमध्ये लॉग-इन करता येईन. रेल्वे ‘ई-वॉलेट’, सुरक्षा- सुविधेसाठी बायोमेट्रिक तसेच ‘एम-पिन’ लॉगिन ही ॲपची आणखी काही वैशिष्ट्ये म्हणता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT