Goa Politics: 'गांजा विकणारा माणूस आमदार'; बाबू आजगांवकरांनी प्रवीण आर्लेकरांवर टीका करत निवडणुकीसाठी थोपटले दंड

Pernem Goa Politics Latest News: माजी आमदार बाबू आजगांवरकरांनी पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणूक लढण्याचा मानस व्यक्त करत विद्यमान आमदारावर टीका केली.
Pernem Goa Politics Latest News
mla pravin arlekar And Ex-mla babu ajgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: माजी आमदार बाबू आजगांवकरांनी अगामी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. पेडण्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे म्हणत आजगांवकरांनी विद्यमान आमदार गांजा विकणारा माणूस असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. तसेच, २०२७ ची विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. आजगांवकरांच्या या टीकेला प्रवीण आर्लेकरांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले.

पेडण्यात झालेल्या असिड हल्ला प्रकरणावरुन बाबू आजगांवकरांनी प्रवीण आर्लेकरांवर टीका केली. “यापूर्वी पेडण्यात अशी घटना घडली नसल्याचे आजगावकर म्हणाले. पेडण्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आमदारांचे लक्ष मतदारसंघावर नाही, ते या परिस्थितीला जबाबदार आहेत. नागरिकांमध्ये पोलिसांचे भय नाही. विद्यमान आमदाराने या गोष्टी मतदारसंघात आणल्या, त्यांचा इतिहास तपासून पहावा, गांजा विक्री करणारा माणूस आमदार आहे,” अशी टीका आजगावकरांनी केली.

Pernem Goa Politics Latest News
ED Raid Goa: गोव्यात ईडीची मोठी कारवाई; इस्टिव्हन डिसोझा यांची 60 कोटींची मालमत्ता जप्त

तसेच, अगामी २०२७ सालची विधानसभा निवडणूक शंभर टक्के लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी चारवेळा या पेडण्यातून निवडून आलो आहे. मी मतदारसंघातील अन्यायकारक गोष्टींविरोधात आवाज उठवून पेडण्यात पुन्हा पहिल्यासारखा विकास करेन, असेही आजगावकर म्हणाले.

Pernem Goa Politics Latest News
गोवा भाजप सरकार विरोधात पुन्हा Toolkit? पर्यटन, टॅक्सीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांना घेरले; पोस्टचा पाऊस

आजगावकरांच्या टीकेला आमदार प्रवीण आर्लेकरांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आजगावकरांचा मुलगाच डिस्कोत गांजा विकतो असा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या आजगावकरांचे डोके फिरलंय असं दिसतं, असे आर्लेकर म्हणाले. आजगावकर २०२७ ची निवडणूक लढणार असतील तर त्याने मला काहीच अडचण नाही, असेही आर्लेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com