Rahul Gandhi targets Amit Shah Dainik Gomantak
देश

गृहमंत्री अमित शहा घाबरले, संसदेत येण्याचे धैर्य त्यांच्यात नाही; विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या मुद्द्यावरून राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi student protest action: गृहमंत्री अमित शहा घाबरले असून विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत संसदेत येऊन विरोधकांना उत्तर देण्याचे धैर्य त्यांच्यात नाही, असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: विद्यार्थ्यांच्या मोर्चावरील कारवाईवरून काँग्रेसने केंद्र सरकारला पुन्हा लक्ष्य केले आहे. गृहमंत्री अमित शहा घाबरले असून विद्यार्थ्यांवरील कारवाईबाबत संसदेत येऊन विरोधकांना उत्तर देण्याचे धैर्य त्यांच्यात नाही, असा खळबळजनक आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला.

तर, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अयोध्येतील राममंदिराच्या देणग्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत देशाला स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान दिले. काँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी सरकारवर कडाडून टीका केली.

‘‘विद्यार्थ्यांवरील कथित हिंसाचाराबाबत पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा संसदेत येऊन उत्तर देण्यास तयार नाहीत. विद्यार्थ्यांवर झालेली हिंसा महत्त्वाची नाही असा संदेश सरकारकडून देशातील तरुणांना दिला जात आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.

अमित शहा यांचे शिक्षणाबाबतचे वैयक्तिक मत महत्त्वाचे नसून, दिल्लीतील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून झालेल्या कारवाईची जबाबदारी कोणाची, हा मुख्य प्रश्न असल्याची खोचक टिपणी राहुल गांधी यांनी केली. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशाशिवाय दिल्ली पोलिस किंवा राखीव पोलिस दलाकडून गोळीबार होऊ शकतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT