Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

माता सरस्वती सर्वांना ज्ञान देवो! कर्नाटकातील हिजाब वादावर राहुल गांधींचे वक्तव्य

शिक्षणाच्या मार्गात हिजाब आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य हिरावून घेत आहोत

दैनिक गोमन्तक

कर्नाटकात (Karnataka) सध्या सुरू असलेला हिजाबचा वाद (Hijab Controversy) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. उडुपी जिल्ह्यातील आणखी तीन महाविद्यालयांनी हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम मुलींना (Muslim Girls) प्रवेश नाकारला . यामुळे संतप्त होऊन अनेक मुस्लिम विद्यार्थीनी आपल्या मैत्रिणीच्या समर्थनार्थ धरणे धरून बसल्या आहेत. आता या मुद्द्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाष्य केले आहे . कर्नाटकात काही मुस्लीम विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्याच्या वादातून शिक्षणाच्या मार्गात हिजाब आणून भारतातील मुलींचे भविष्य हिरावून घेतले जात असल्याचे त्यांनी आज म्हटले. (Rahul Gandhi statement on Hijab Controversy in karnataka)

मा सरस्वती सर्वांना ज्ञान देवो

लोकसभा खासदार राहुल गांधी यांनी सरस्वती पूजनाच्या निमित्ताने हे ट्विट केले, 'शिक्षणाच्या मार्गात हिजाब आणून आपण भारतातील मुलींचे भविष्य हिरावून घेत आहोत. मा सरस्वती सर्वांना ज्ञान देवो. ती भेदभाव करत नाही.' असे ट्विट गांधी यांनी केले. कर्नाटकातील उडुपी येथील एका सरकारी महाविद्यालयात काही विद्यार्थिनींनी हिजाब परिधान केल्याने वाद सुरू झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत कुंदापूर महाविद्यालयातील हिजाब परिधान केलेल्या मुस्लिम विद्यार्थिनींना मुख्याध्यापकांनी संस्थेच्या मुख्य गेटवर अडवले. या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक सरकारने पुढील आठवड्यात उच्च न्यायालयाचे आदेश येईपर्यंत शैक्षणिक संस्थांना पोशाखाबाबतचे सध्याचे नियम पाळण्यास सांगितले आहे.

हिजाब परिधान करून येणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींवर बंदी

दरम्यान, कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील आणखी तीन महाविद्यालयांनी हिजाब परिधान केलेल्या महिला मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला, ज्यामुळे अनेक संतप्त मुस्लिम विद्यार्थी त्यांच्या सहकाऱ्यांच्या समर्थनार्थ धरणे धरत बसले आहेत. गतवर्षी 28 डिसेंबरलाही उडुपीमधून असे पहिले प्रकरण समोर आले होते. आतापर्यंत एकूण पाच शैक्षणिक संस्थांनी (तीन सरकारी महाविद्यालये आणि दोन खाजगी संस्था) हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT