Rahul Gandhi vote chori video Dainik Gomantak
देश

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

Rahul Gandhi Vote Chori Viral Video: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'वोट चोरी'चा आरोप केला आहे

Akshata Chhatre

Rahul Gandhi viral video: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा 'वोट चोरी'चा आरोप केला आहे. यासाठी त्यांनी 'लापता लेडीज' या लोकप्रिय चित्रपटापासून प्रेरित होऊन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे त्यांनी जनतेला 'वोट चोरी से आझादी' या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडिओतून साधला निशाणा

राहुल गांधींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर (X) हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, "चोरी चोरी, चुपके चुपके... अब और नहीं, जनता जाग गई है." व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पोलीस ठाण्यात आपली वस्तू चोरीला गेल्याची तक्रार नोंदवते.

पोलिसांनी विचारले, "काय चोरीला गेले?", तेव्हा तो माणूस थोडासा संकोच करून उत्तर देतो, "वोट." त्यावर पोलीस अधिकारी आश्चर्यचकित होऊन, "हे कसं शक्य आहे?" असा प्रश्न विचारतो. व्हिडिओच्या शेवटी, "तुमच्या मताची चोरी म्हणजे तुमच्या अधिकारांची चोरी," असा संदेश दिला आहे.

'व्होट चोरी से आझादी' अभियानाची सुरुवात

काँग्रेसने 'वोट चोरी से आझादी' अभियान सुरू केले असून, या मोहिमेअंतर्गत लोकांना भाजप आणि निवडणूक आयोगाच्या कथित 'वोट चोरी'विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काँग्रेसने लोकांना त्यांच्या सोशल मीडियावरील डिस्प्ले पिक्चर बदलून या अभियानाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

राहुल गांधींकडून 'वोटर अधिकार यात्रा' जाहीर

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १४ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी 'वोटर अधिकार यात्रा' सुरू करण्याची घोषणा केली. मतदार यादीतील विशेष सुधारणा प्रक्रियेविरोधात ही यात्रा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"१७ ऑगस्टपासून #VoterAdhikarYatra द्वारे आम्ही बिहारच्या भूमीतून 'वोट चोरी' विरोधात थेट लढा सुरू करत आहोत," असे ते म्हणाले. हा केवळ निवडणुकीचा मुद्दा नसून, लोकशाही, संविधान आणि 'एक व्यक्ती, एक मत' या तत्त्वांचे संरक्षण करण्यासाठीची ही एक निर्णायक लढाई आहे. आम्ही संपूर्ण देशात स्वच्छ मतदार यादी सुनिश्चित करू, असेही राहुल गांधी यांनी ठामपणे सांगितले.

कर्नाटक आणि निवडणूक आयोगाचाही उल्लेख

यापूर्वी, ७ ऑगस्ट रोजी राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करताना, निवडणुका नियोजित असतात असा आरोप केला होता. कर्नाटकच्या महादेवनगर विधानसभा मतदारसंघातील मतदानाचा अभ्यास सादर करताना त्यांनी १,००,२५० मतांची कथित चोरी झाल्याचा दावा केला होता. या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना त्यांच्या दाव्यांच्या पुष्टीसाठी लेखी निवेदन सादर करण्यास सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT