Rahul Gandhi drives a tractor to reach Parliament, to support Farmer Protest  Dainik Gomantak
देश

राहुल गांधीचं शेतकऱ्यांच्या समर्थनात ट्रॅक्टर आंदोलन

शेतकरी कृषी कायद्याविरोधात सातत्याने निषेध करत आहेत. दरम्यान, स्वत: राहुल गांधी(Rahul Gandhi) आज ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचत आहेत.

दैनिक गोमन्तक

शेतकरी कृषी कायद्याविरोधात सातत्याने निषेध करत आहेत. दरम्यान, स्वत: राहुल गांधी आज ट्रॅक्टर चालवून संसदेत पोहोचत आहेत. म्हणजे आजही संसदेत जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या(Delhi) वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन(Farmer Protest) सुरू आहे. या आंदोलनाचा आवाज संसदेपर्यंत(Parliament) ऐकू येत आहे. विरोधक शेतकरी कायद्यांच्या(Agriculture Bill) मुद्यावर पावसाळी अधिवेशनात गदारोळ निर्माण करीत आहेत. दरम्यान, आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही(Rahul Gandhi) या शेतकरीविरोधी कायद्याच्या निषेधात सामील झालेले पाहायला मिळाले.

स्वत: राहुल गांधी आज ट्रॅक्टर चालवून संसद भवनात पोहोचले. राहुल ज्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने संसद भवनात पोहोचला होता त्यावर लाल रंगाचे बोर्ड होते. ज्यावर 'कृषीविरोधी तीन काळे कायदे परत घ्या,परत घ्या '.

संसदेत पोहोचतांना राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधत "आम्ही शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत.शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला शेती कायदे मागे घ्यावेच लागतील. हे कायदे 2-3 बड्या उद्योगपतींसाठी आहेत. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाहीत, नफ्यासाठी नाहीत. हे काळे कायदे आहेत. " अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान आजही कृषी कायद्याच्या मुद्दय़ावरून संसदेत तीव्र गदारोळ होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT