देशातील स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे स्वागत(Independence Day) राष्ट्रगीताद्वारे केले जाईल जे राष्ट्रगीत(National Anthem) देशवासी एकत्र गात त्याचे स्वागत करतील. अधिकाधिक लोकांना राष्ट्रगीताचा भाग बनवण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.कालच 'मन की बात'(Mann Ki Baat) या कार्यक्रमात या संदर्भात माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांनी लोकांना पुढे जाण्यासाठी 'राष्ट्र प्रथम, नेहमी प्रथम' हा मंत्र देऊन देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी 12 मार्चपासून संपूर्ण देशात अमृत महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदींनी देशाच्या विकासासाठी ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यात साऱ्या देशाची एकी होती अगदी त्याचप्रमाणे ऐक्याची गरज आताही हवी आहे यावर काळ बोलताना भर दिला. त्यांचा संदेश स्पष्ट आहे की विकासाची गती वाढविण्यासाठी आपल्याला आपल्या लहान मतभेदांना सोडून एकत्र काम करावे लागेल.
तसेच चळवळीच्या रूपाने देशात एकता भावनेला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे .ते म्हणाले की बापूंच्या नेतृत्वात ज्याप्रमाणे 'भारत छोडो आंदोलन' सुरू केले गेले त्याच प्रकारे आज प्रत्येक देशाला 'भारत जोडो आंदोलन' आंदोलन करावे लागेल.
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाचे साक्षीदार होणे हा बहुमान असल्याचे वर्णन करताना पंतप्रधान म्हणाले की, याची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने होईल. यासाठी, सांस्कृतिक मंत्रालय 'नॅशनल अँथॅम.इन' नावाची वेबसाइट तयार करत असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली आहे. या वेबसाइटच्या मदतीने, कोणतीही व्यक्ती राष्ट्रगीत गाताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकते आणि वेबसाइटवर अपलोड करू शकते. ते म्हणाले की, लोकांना त्यातून जोडण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. जास्तीत जास्त लोक एकत्रितपणे राष्ट्रगीत गाऊन या अभियानाचा भाग व्हावेत, हा सरकारचा प्रयत्न असेल. येत्या काळात अशा आणखी अनेक मोहीम सुरू केल्या जातील, असेही पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे .
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.