Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

'PM मोदींच्या मास्टरस्ट्रोकने जनतेच्या हातातील पैसा केला गायब'

केंद्रातील नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल सुरुच आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल सुरुच आहे. राहुल दीर्घकाळापासून महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन सरकारवर हल्लाबोल करत असून आता पुन्हा एकदा त्यांनी महागाईवरुन निशाणा साधला आहे. महागाई दर आणि फिक्स डिपॉझिट रेट यांची तुलना करताना काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या 'मास्टरस्ट्रोक' मुळे तुमचा कष्टाचा पैसा नष्ट झाला आहे.' (Rahul Gandhi criticized Prime Minister Narendra Modi)

दरम्यान, राहुल गांधी यांनी आज ट्विट करुन महागाई दर (Inflation rate) आणि मुदत ठेवी दर यांची तुलना केली. त्यांनी सांगितले की, ''महागाईचा दर 6.95 टक्क्यांवर गेला आहे, तर मुदत ठेवीचा दर 5 टक्क्यांवर आला आहे. तुमच्या बँक खात्यांमध्ये ₹15 लाख जमा होणार आता विसरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मास्टरस्ट्रोक' ने तुमचे कष्टाचे पैसे नष्ट केले आहेत.''

त्याच ट्विटद्वारे, त्यांनी डेटाच्या आधारे सांगितले की, ''2 लाख रुपये निश्चित केल्यावर 2022 मध्ये 11,437 रुपये व्याज मिळत होते, तर 2012 मध्ये त्यांना 19,152 रुपयांपेक्षा जास्त मिळत होते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT