PM Modi  Dainik Gomantak
देश

India Diplomacy: PAK मधून अभिनंदनची सुटका ते कतारमधील माजी नौसैनिकांच्या सुटकेपर्यंत, मोदी सरकारचे 10 राजनियक विजय

Modi Government: सध्या जगभर भारताचे कौतुक होत आहे. कतारमध्ये तुरुंगात असलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका हा भारताचा मोठा राजनयिक विजय आहे.

Ganeshprasad Gogate

India Diplomacy: सध्या जगभर भारताचे कौतुक होत आहे. कतारमध्ये तुरुंगात असलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका हा भारताचा मोठा राजनयिक विजय आहे. अलीकडच्या काळात मोदी सरकारच्या धाडसी मुत्सद्दी पावलांमुळे जगामध्ये भारताचे स्थान मजबूत झाले आहे. चला तर मग मोदी सरकारच्या 10 राजनयिक विजयाबद्दल जाणून घेऊया...

नौदलाच्या अधिकाऱ्यांची सुटका

दरम्यान, कतारने (Qatar) यापूर्वी आठ माजी भारतीय नौसैनिकांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. दुबई येथे COP28 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची भेट घेतली. यानंतर कतारने या अधिकाऱ्यांची शिक्षा कमी केली. आठपैकी 7 माजी सैनिक कतारहून भारतात आले आहेत.

रशियाकडून तेल खरेदी

दुसरीकडे, युक्रेनशी युद्ध केल्याबद्दल रशियावर अनेक निर्बंध लादले गेले. अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर आंतरराष्ट्रीय व्यापारापासून अनेक निर्बंध लादले, मात्र त्यानंतरही भारताने मॉस्कोकडून कमी किमतीत कच्चे तेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे पुनरागमन

2019 मध्ये, भारताने (India) पाकिस्तानमध्ये अडकलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना यशस्वीरित्या परत केले. मोदी सरकारचा हा सर्वात मोठा राजनयिक विजय होता. त्यावेळची परिस्थिती अशी होती की, भारताच्या कारवाईने पाकिस्तान घाबरला होता आणि तत्कालीन इम्रान सरकारने अभिनंदनच्या सुटकेची घोषणा संसदेत केली होती.

ऑपरेशन गंगा

गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात भारत सरकारने युक्रेनच्या युद्धक्षेत्रात ऑपरेशन गंगा राबवले होते. याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले.

वंदे भारत मिशन (VBM)

कोरोना काळात परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन वंदे भारत सुरु करण्यात आले. जगभरातील हवाई उड्डाणांवर निर्बंध होते. यामध्येही सरकारने परदेशातून भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणले.

ऑपरेशन समुद्र सेतू

कोरोना महामारीच्या काळात भारतीय नौदलाने ऑपरेशन ‘समुद्र सेतू’ चालवले होते. त्याअंतर्गत परदेशातून भारतीय नागरिकांना परत आणण्याचे काम करण्यात आले. तसेच, ऑपरेशन समुद्र सेतू-2 अंतर्गत, भारतीय नौदलाने ऑक्सिजनने भरलेले कंटेनर देशात पोहोचवले होते.

ऑपरेशन संजीवनी

कोविड-19 काळात आंतरराष्ट्रीय सीमा बंद असताना, भारतीय हवाई दलाने (IAF) ऑपरेशन संजीवनी अंतर्गत मालदीवला भारताकडून 6.2 टन आवश्यक वैद्यकीय औषधांचा पुरवठा केला.

मोफत लस

जेव्हा कोरोना विषाणू जगात आपले पाय पसरवत होता, तेव्हा भारताने अनेक देशांना मोफत कोरोनाची लस दिली होती. यामुळे भारताला विकसनशील देशांमध्ये राजकीय प्रभाव वाढण्यास मदत झाली.

ऑपरेशन अजय

इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारत सरकारने ऑपरेशन अजय सुरु केले. या अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात आले.

दिल्लीत G-20 शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात देशाची राजधानी दिल्लीत G-20 शिखर परिषद यशस्वीरित्या पार पडली. जेव्हा संपूर्ण जग रशियाच्या विरोधात होते, तेव्हा भारताने जी-20 परिषदेत आपली मैत्री दाखवली होती. त्यांनी रशिया-युक्रेनमधील मतभेद दूर करण्यासाठी एक घोषणा केली, ज्या घोषणेस सर्व सदस्य देशांनी सहमती दर्शवली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT