Odisha Shocker Dainik Gomantak
देश

Odisha Shocker: धक्कादायक! 15 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून जाळलं; विद्यार्थिनीच्या आत्मदहनाच्या घटनेनंतर दुसऱ्यांदा हादरले बालासोर

Odisha Crime: ओडिशातील बालासोर येथे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या घटनेनंतर काही दिवसांतच पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Sameer Amunekar

पुरी: ओडिशातील बालासोर येथे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या घटनेनंतर काही दिवसांतच पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुरी जिल्ह्यातील बयाबार गावात ३ पुरूषांनी १५ वर्षीय मुलीला पेट्रोल ओतून जाळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी जात असताना तिच्यावर हल्ला झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनी मुलीला अडवून पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत मुलीला तत्काळ एम्स भुवनेश्वर येथे दाखल करण्यात आले आहे. मुलीच्या उपचाराचा पूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, अशी माहिती ओडिशाच्या महिला आणि बालविकास विभागाच्या प्रभारी उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी दिली आहे.

परिदा यांनी त्यांच्या सोशल मीडिया X हँडलवरून या घटनेची माहिती दिलीय. पुरी जिल्ह्यातील बालंगा येथे १५ वर्षीय मुलीवर पेट्रोल ओतून जाळल्याची बातमी अत्यंत दु:खद आणि धक्कादायक आहे. मुलीला तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले असून, पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचा आदेश देण्यात आलाय, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.

या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा संबंध काही दिवसांपूर्वी घडलेल्या बालासोर येथील २० वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी जोडला जात आहे.

लैंगिक छळाला कंटाळून आत्महत्या

१२ जुलै रोजी बालासोरमधील फकीर मोहन महाविद्यालयातील २० वर्षीय विद्यार्थिनीने एका सहाय्यक प्राध्यापकाविरोधात लैंगिक छळाच्या तक्रारीवर प्रशासनाने कारवाई न केल्यामुळे संतप्त होऊन कॉलेज कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवून घेतलं होतं. ही विद्यार्थिनी गंभीर भाजल्याने तिला एम्स भुवनेश्वर येथे दाखल करण्यात आले होते.

मात्र, १४ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी सहाय्यक प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) पथकानेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, यासंदर्भात विरोधकांनी ओडिशा बंदचे आवाहन करत सरकारवर हल्ला चढवला आहे.

पिडित विद्यार्थिनीला विभागप्रमुखाकडून (एचओडी) सातत्याने लैंगिक छळाला सामोरे जावे लागत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या छळामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थिनीने १२ जुलै रोजी कॉलेज कॅम्पसमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

या घटनेत ती ९० टक्क्यांहून अधिक भाजली होती. तिच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला एम्स भुवनेश्वर येथे हलवण्यात आले. तिथे १४ जुलै रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्यात 54 लाख पर्यटक! सहा महिन्यात विक्रमी भरारी; पर्यटनाचा नवा उच्चांक नोंद

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातली भुताटकी

Forced Conversion: हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

Goa Accident: 2 वाहनांची समोरासमोर टक्कर, ताबा सुटून गाडी कोसळली; गोव्यात अपघाती मृत्यूंचे सत्र सुरूच

Goa Politics: 'शत्रू चित्रपटातच नव्हे, विधानसभेतही झोपतात'! सरदेसाईंचा टोला; कुणाची ॲलर्जी नसल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT