Crime News Dainik Gomantak
देश

Jarnail Singh Murder: गँगस्टर जर्नेल सिंहचा पंजाबमध्ये खून, अज्ञात हल्लेखोरांनी केला बेछूट गोळीबार!

Punjab Crime: जर्नेल सिंहवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी 20-25 गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने जर्नेल सिंहचा जागीच मृत्यू झाला.

Manish Jadhav

Gangster Jarnail Singh: पंजाबमधील अमृतसरमध्ये गँगस्टर जर्नेल सिंहची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माहितीनुसार, जर्नेल सिंहवर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी 20-25 गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने जर्नेल सिंहचा जागीच मृत्यू झाला.

अमृतसरजवळील सत्याला गावात ही घटना घडली. जर्नेल सिंहला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी (Doctor) त्याला मृत घोषित केले. गोपी घनश्यामपुरियासोबत जर्नेल सिंहचे संबंध होते, असे सांगितले जात आहे.

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, जर्नेलवर 4 अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी जर्नेल आपल्या काही सहकाऱ्यांसोबत घरात बसला होता.

डीएसपी हरकिशन सिंह यांनी सांगितले की, हल्लेखोर जर्नेलच्या घरात घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. सुमारे 15 मिनिटे गोळीबार सुरु होता, त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. घाईगडबडीत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली.

दुसरीकडे, पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. जर्नेलला सुमारे 20-25 गोळ्या लागल्या, तर त्याचा एक साथीदारही गंभीर जखमी झाला आहे. जर्नेलच्या साथीदाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर संपूर्ण जर्नेल गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तपासादरम्यान पोलिसांना घटनेचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज मिळाले आहे. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याचा तपास आता पोलिसांनी सुरु केला आहे. त्याचवेळी या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, त्यात काही लोक गोळ्या झाडताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT