Punjab And Haryana High Court: अमृतपाल सिंग प्रकरणी न्यायालय सक्त, '80 हजार पोलिस असताना...

Amritpal Singh: अमृतपाल सिंग वगळता सर्वांना अटक कशी झाली? जर तो पळून गेला असेल तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
Amritpal Singh
Amritpal SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Punjab And Haryana High Court: पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकारला विचारले की, अमृतपाल सिंग वगळता इतरांना कशी अटक केली? जर तो पळून गेला असेल तर ते गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

'वारिस पंजाब दे' च्या कायदेशीर सल्लागाराने दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणी सुरु ठेवली. यामध्ये, प्रतिवादींना फरारी अमृतपालला हजर करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली.

दरम्यान, न्यायमूर्ती एन.एस. शेखावत यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल विनोद घई यांना विचारले की, तो (अमृतपाल सिंग) कसा पळाला? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, आम्ही या प्रकरणातील इतर आरोपींना अटक केली आहे. अमृतपाल सिंग वगळता इतरांना कशी अटक केली, अशी विचारणा खंडपीठाने केली.

खंडपीठ म्हणाले की, तुमच्याकडे 80 हजार पोलिस (Police) आहेत. त्याला अटक कशी झाली नाही? त्यावर महाधिवक्ता म्हणाले की, असे कधी कधी होते. जी-20 शिखर परिषदही सुरु होती.

Amritpal Singh
Amritpal Singh CCTV: अमृतपालने पोलिसांना दिला गुंगारा; गाडी बदलून झाला फरार, पाहा सीसीटीव्ही फुटेज

दुसरीकडे, न्यायालयाने या प्रकरणात वकील तनु बेदी यांची अ‍ॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली आणि सुनावणी चार दिवसांसाठी तहकूब केली. न्यायालयाने सरकारकडून स्टेटस रिपोर्टही मागवला आहे.

अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, अमृतपाल सिंग याच्या विरोधात एनएसएची मागणी करण्यात आली आहे.

अमृतपाल सिंग सातत्याने पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रीय तपास संस्था (NIA) मंगळवारी या प्रकरणाचा तपास हाती घेऊ शकते. सूत्रांनी ही माहिती दिली. एनआयएचे एक पथक पंजाबमध्ये पोहोचले असून पंजाब (Punjab) पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.

Amritpal Singh
Amritpal Singh : खलिस्तानी समर्थक अमृतपालच्या अटकेसाठी सर्च ऑपरेशन, पंजाबमध्ये हाय अलर्ट

आता मंगळवारी हे प्रकरण एनआयए आपल्या हातात घेण्याची दाट शक्यता आहे. एनआयए या प्रकरणाशी संबंधित तपशील आणि कागदपत्रे मागवत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या अनेक एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

सूत्रांनी सांगितले की, NIA या प्रकरणाचा ताबा घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या आयएसआयशी दहशतवादी संबंध असल्याने गृह मंत्रालय हे प्रकरण हस्तांतरित करण्याचा निर्णय घेऊ शकते. अमृतपाल सध्या फरार असून तो परदेशात पळून गेला असावा, असे बोलले जात आहे. त्याला पकडण्यासाठी एजन्सी छापे टाकत आहे, मात्र त्याचा पत्ता लागलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com