Bhagwant Mann Dainik Gomantak
देश

Punjab News: 'मद्यधुंद' असल्याने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून उतरवले?

केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले आरोपांची चौकशी करणार

गोमन्तक डिजिटल टीम

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab Chief Minister Bhagwant Mann) मद्यधुंद असल्याने त्यांना विमानातून उतरवले. असा आरोप शिरोमणी अकाली दल (एसएडी) प्रमुख सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी केला. या आरोपांची चौकशी करणार असल्याचे केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Union Aviation Minister Jyotiraditya Scindia) म्हटले आहे. वस्तुस्थितीची पडताळणी करणे महत्त्वाचे असल्याचे सिंधिया यांनी म्हटले आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान फ्रँकफर्ट विमानतळावर लुफ्थान्साच्या विमानातून उतरवण्यात आले. भगवंत मान मद्यधुंद अवस्थेत होते असा आरोप शिरोमणी अकाली दल (SAD) प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी केला. काँग्रेस नेते प्रताप सिंह बाजवा (Pratap Singh Bajwa) यांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, सिंधिया यांना याबाबत पत्र पाठवले आहे.

"वस्तुस्थितीची पडताळणी करू, याची आम्हाला खात्री करावी लागेल. याबाबत माहिती देणं लुफ्थान्सा एअरलाइन्सवर अवलंबून आहे. मला पाठवलेल्या चौकशी पत्राच्या आधारावर, मी नक्कीच यात लक्ष घालेन." अशी प्रतिक्रिया सिंधिया यांनी दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आठ दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर होते. परदेशी गुंतवणूक राज्यात घेऊन येण्यासाठी मान यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. दरम्यान, मान यांच्यावर केलेल्या या आरोपांचे आम आदमी पक्षाच्या वतीने खंडन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानावर अपघात! थ्रोचा निशाणा चुकला अन् फलंदाजाला दुखापत; खेळाडूला स्ट्रेचरवरून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल

Asia Cup Trophy Controversey: 'मोहसिन नक्वींनी जे केलं ते एकदम बरोबर...'; सूर्यकुमार यादवला अपशब्द बोलणारा पाक क्रिकेटपटू पुन्हा बरळला

Goa Murder Case: प्रियकरासाठीच आईने पोटच्या गोळ्याचा गळा घोटला; रुग्णालयात नेले म्हणून प्रकरणाला वाचा फुटली

Viral Video: फोन चोरीपासून वाचवण्याचा तरुणाचा 'Z+ सिक्युरिटी' फॉर्म्युला, ट्रेनमधील अतरंगी व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "भावाला कशाचीच भीती नाही..."

T20 World Cup 2026: 'टी20 वर्ल्ड कप'साठी सर्व 20 संघ निश्चित; नेपाळ, ओमाननंतर जपानला हरवून यूएईनं तिकीट केलं पक्क; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT