Khursheed Alam Dainik Gomantak
देश

संतापजनक! पाकिस्तान-बांग्लादेश झिंदाबादच्या घोषणा देत प्रोफेसरची मुस्लीम धर्मियांसाठी वेगळ्या देशाची मागणी

Khursheed Alam: "माझ्या पोस्टचा अर्थ कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. पण माझी पोस्ट अगदी बरोबर आहे आणि मी त्यावर ठाम आहे."

Ashutosh Masgaunde

Proclaiming Pakistan-Bangladesh Zindabad, Professor Khurshid Alam from Bihar demands a separate country for Muslims:

सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असलेल्या बिहारमधून एक मोठी घटना समोर आली आहे. राज्यातील सिवानमधील कॉलेजच्या एका प्राध्यापकाने सोशल मीडिया अकाउंटवर पाकिस्तान-बांग्लादेश झिंदाबादच्या घोषणा देत मुस्लीम धर्मियांसाठी वेगळ्या देशाची मागणी केली आहे. ही मागणी करणाऱ्या प्राध्यापकाचे नाव खुर्शीद आलम असे आहे.

प्राध्यपकाने फेसबूकवर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही सरकारांना पाकिस्तान-बांगलादेशला लागून असलेल्या भागात भारतीय मुस्लिमांना मातृभूमी देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी याला भारतीय मुस्लिमांची मागणी म्हटले आहे.

यासोबतच संयुक्त पाकिस्तान आणि बांगलादेश जिंदाबादच्या घोषणाही दिल्या. ही सोशल मीडिया पोस्ट दोन दिवसांपूर्वीची आहे, पण आता गदारोळ सुरू आहे. या गदारोळामुळे खुर्शीद आलम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून दोन्ही पोस्ट गायब आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Khursheed Alam Facebook Post
Khursheed Alam Facebook Post

सिवानच्या गोरिया कोठी ब्लॉकमध्ये असलेल्या नारायण कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक खुर्शीद आलम यांनी त्यांच्या फेसबुक आयडीवर युनायटेड पाकिस्तान आणि बांगलादेश झिंदाबाद लिहून पोस्ट केले आहे.

दुसऱ्या पोस्टद्वारे मी सरकार आणि भारतीय मुस्लिम दोघांनाही आवाहन करत आहे की, पाकिस्तान आणि बांगलादेशला जोडून स्वतंत्र मातृभूमी हवी आहे.

आता ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ही बाब जेपी विद्यापीठाच्या निदर्शनास आल्यानंतर प्राध्यापक खुर्शीद आलम यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे.

प्राध्यपक म्हणतो, मी माझ्या मतावर ठाम

नारायण कॉलेजमधील राज्यशास्त्राचा सहायक प्राध्यापक खुर्शीद आलम म्हणाला की, होय मी या प्रकारची पोस्ट टाकली आहे. मात्र पाकिस्तान आणि बांगलादेश जोडून वेगळा देश निर्माण करण्याची मागणी करण्यात आली आहे. मी यात भारताला विरोध केलेला नाही. तसेच त्यात देशद्रोहाचे काही नाही.

कारणे दाखवा नोटिस प्रकरणातही प्राध्यापक म्हणाला की, त्याला विद्यापीठाने कारणे दाखवा नोटिस दिली आहे. याचे उत्तर मी सोमवारी देईन. माझ्या पोस्टचा अर्थ कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो. पण माझी पोस्ट अगदी बरोबर आहे आणि मी त्यावर ठाम आहे.

या सर्व प्रकरणानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी खुर्शीद आलम याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, तक्रारही दाखल केली आहे. यासह बिहारमध्ये इतर राजकिय-सामाजिक संघटनांनीही याचा निषेध करत आंदोलने केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT