पोटात लपवून आणलेले नऊ कोटींच्या अमली पदार्थांसह दोन नायजेरियन नागरिकांना अटक

Mumbai: जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 9 कोटी रुपये आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Mumbai: Two Nigerian nationals held with Rs 9 crore drugs
Mumbai: Two Nigerian nationals held with Rs 9 crore drugsDainik Gomantak
Published on
Updated on

Two Nigerian nationals held with Rs 9 crore drugs in Mumbais Saki naka area:

मुंबईच्या साकी नाका परिसरात दोन नायजेरियन नागरिकांना 9 कोटी रुपयांच्या ड्रग्जसह अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकी विहार रोडवरील हंसा इंडस्ट्रियल इस्टेटजवळ आरोपींना अटक करण्यात आली.

"आरोपींकडून 880 ग्रॅम कोकेन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 9 कोटी रुपये आहे," पोलिसांनी सांगितले.

गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हंसा औद्योगिक वसाहतीसमोर बंदोबस्त ठेवला होता, दोन्ही संशयित घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची झडती घेतली असता त्यांच्या बॅगेत 88 मोठ्या कॅप्सूल आढळून आल्या, त्या पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतल्या.

जप्त केलेल्या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 9 कोटी रुपये आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Mumbai: Two Nigerian nationals held with Rs 9 crore drugs
घटस्फोटित मुस्लिम महिलेला तिच्या पहिल्या नवऱ्याकडून बिनशर्त भरणपोषणाचा अधिकार, हायकोर्टाचा निर्णय

ते कोणाला अमली पदार्थ पुरवठा करण्यासाठी आले होते, याचा शोध घेण्यासाठी साकीनाका पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत, असेही पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Mumbai: Two Nigerian nationals held with Rs 9 crore drugs
गोवा ट्रिपवरून परतताना अपघात; उड्डाणपुलावरून खाली कोसळली कार

यातील चौकशीनंतर पोलिसांनी त्याचा सहकारी आणि पुरवठादार, 19 वर्षीय डॅनियल या व्हेनेझुएलाच्या नागरिकाला अटक केली, ज्याने इथिओपियामधून अमली पदार्थ पोटात लपवून देशात आणली होती. दोन्ही परदेशी लोकांना अंमली पदार्थ, ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

डॅनियलच्या चौकशीमुळे पोलिसांना साकीनाका येथील हॉटेलमध्ये नेले, तेथून पोलिसांनी व्हेनेझुएलाचा नागरिक जोएल रामोस (19) याला अटक केली.

रामोस काही दिवसांपूर्वी आदिस अबाबा येथून इथिओपियन एअरलाइनने भारतात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने कोकेनच्या कॅप्सूल पोटात लपवून ठेवल्या होत्या. त्याची भारतात यशस्वी तस्करी केल्यानंतर त्याने ती डॅनियलला पुढील विक्रीसाठी दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com