सरकार आणि कंपन्यांनी देशभरात कोविड लसीच्या बूस्टर डोसची किंमत कमी करण्याची घोषणा केली असली तरी, तामिळनाडूमध्ये तसे झाल्याचे दिसत नाही. तामिळनाडूच्या खासगी रुग्णालयांमध्ये रविवारी पहिल्याच दिवशी ज्यांनी कोरोना लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेतला, त्यांना संपूर्ण किंमत मोजावी लागली. (Private hospitals in Tamil Nadu did not reduce the price of covid vaccine)
तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute) कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनने डोसची किंमत केवळ 225 रुपयांपर्यंत मर्यादित केली आहे. कोविशील्ड लसीची बाजारातील किंमत 600 रुपये आणि कोव्हॅक्सीनची किंमत 1200 रुपये अधिक होती.
या कंपन्यांनी सरकारशी सल्लामसलत केल्यानंतर बूस्टर डोसचे दर कमी केले होते. भारतात, रविवारपासूनच 18 वर्षांवरील सर्व लोकांसाठी बूस्टर डोस लसीकरण (Vaccination) सुरू झाले आहे. तामिळनाडूमधील खाजगी रुग्णालयांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे अजूनही लसीचा खूप जुना साठा आहे आणि त्यांना तो आधी रिकामा करावा लागेल. त्यामुळेच चेन्नई आणि इतर ठिकाणच्या खासगी रुग्णालयांमध्ये पहिल्या दिवशी बूस्टर डोससाठी फारसा उत्साह दिसून आला नाही.
चेन्नईच्या (Chennai) कावेरी हॉस्पिटलमधील आपत्कालीन औषध विभागाच्या प्रमुख डॉ. अश्लेषा विजय सेठ यांनी सांगितले की, सरकारने लसीच्या किंमतीवर मर्यादा निश्चित केली आहे आणि सर्व रुग्णालये त्याचे पालन करतील अशी अपेक्षा आहे. येत्या काही दिवसांत हे घडेल. रविवारी पहिल्याच दिवशी चेन्नईतील बहुतेक रुग्णालयांमध्ये लोकांचा बूस्टर डोसला फारच कमी प्रतिसाद मिळाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.