Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

'...स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानामुळे': पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरुन शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त देशाला संबोधित केले.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लाल किल्ल्यावरुन शीख गुरु तेग बहादूर यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''आज आपण जिथे आहोत, ते लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला संबोधित करण्यापूर्वी एक नाणे आणि टपाल तिकीट जारी केले.'' भारत जागतिक कल्याणासाठी काम करतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले.

पीएम मोदी म्हणाले की, ''हा लाल किल्ला अनेक महत्त्वाच्या कालखंडाचा साक्षीदार आहे. या किल्ल्याने गुरु तेग बहादूर साहिब यांचे हौतात्म्यही पाहिले आहे. देशासाठी शहीद झालेल्यांच्या धैर्याचीही परीक्षा या किल्ल्याने पाहिली आहे. गुलामगिरीतून मिळालेले स्वातंत्र्य भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक प्रवासापासून अलिप्तपणे पाहिले जाऊ शकत नाही. आज देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि गुरु तेग बहादूर साहिब (Guru Teg Bahadur Sahib) यांचा 400 वा प्रकाश पर्व एकत्र साजरा करत आहे.''

गुरु तेग बहादूर औरंगजेबासमोर उभे होते: पंतप्रधान मोदी

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''गुरुद्वारा शिशगंज साहिब हे गुरु तेग बहादूरजींच्या अमर बलिदानाचे प्रतीक आहे. हा पवित्र गुरुद्वारा आपल्याला आठवण करुन देतो की, आपल्या महान संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी गुरु तेग बहादूरजींचे बलिदान किती महान होते. त्यावेळी देशात धार्मिक कट्टरतेचे वादळ होते. धर्माला तत्त्वज्ञान, विज्ञान आणि आत्मसंशोधनाचा विषय मानणारे, धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि अत्याचार करणारे लोक भारताला आव्हान देत होते.''

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''त्यावेळी भारताला आपली ओळख वाचवण्याची मोठी आशा गुरु तेग बहादूरजींच्या रुपात दिसली होती. त्यावेळी औरंगजेबाच्या जुलमी विचारांसमोर गुरु तेग बहादूरजी आत्मविश्वासाने उभे होते.''

तसेच, गुरु नानक देवजींनी संपूर्ण देशाला एका सूत्रात बांधले. त्यावेळी गुरु तेग बहादूरजींचे अनुयायी सर्वत्र होते. पटना येथील पटना साहिब आणि दिल्लीतील रकाबगंज साहिब इथे आपल्याला सर्वत्र गुरुंच्या आशीर्वादाच्या रुपात भारताचे दर्शन घडते, असेही पंतप्रधान म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT