''उठा उठा पंतप्रधान व्हायचयं'', इंदर कुमार गुजराल बनले होते देशाचे 12 वे पंतप्रधान

इंदर कुमार गुजराल 1997 मध्ये आजच्या दिवशी देशाचे 12 वे पंतप्रधान बनले होते.
Inder Kumar Gujral
Inder Kumar GujralDainik Gomantak

इंदर कुमार गुजराल 1997 मध्ये आजच्या दिवशी देशाचे 12 वे पंतप्रधान बनले होते. त्यावेळी केंद्रात आघाडी करुन सरकार स्थापन करण्याचा नवा प्रयोग सुरु झाला होता. गुजराल यांच्या आधी एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार सत्तेत होते. गुजराल यांच्या आधी एचडी देवेगौडा (Hd Deve Gowda) यांच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार सत्तेत होते. या सरकारला काँग्रेसचा पाठिंबा होता, परंतु देवेगौडा पंतप्रधान झाल्यानंतर केवळ 10 महिन्यांतच काँग्रेसने (Congress) पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले. यानंतर पुढच्या पंतप्रधानासाठी अनेक नावांवर चर्चा सुरु झाली. दुसरीकडे, युती पक्षांच्या बैठकीत इंदर कुमार गुजराल (Inder Kumar Gujral) यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेच्या वेळी गुजराल हे त्यांच्या निवासस्थानी आराम करत होते. युतीचे नेते त्यांच्या घरी पोहोचले आणि गुजराल यांना उठवत म्हणाले, 'जागे व्हा, आता तुम्हाला पंतप्रधान बनायचे आहे.' अखेर 21 एप्रिल 1997 रोजी गुजराल यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. गुजराल 19 मार्च 1998 पर्यंत पंतप्रधानपद भूषवले. (Inder Kumar Gujral became 12th Prime Minister of India)

गुजराल यांचा जन्म पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला

इंदर कुमार गुजराल यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 रोजी झेलम, पंजाब, पाकिस्तानमध्ये (Pakistan) झाला. गुजराल यांचे आई-वडील स्वातंत्र्यसैनिक होते. गुजराल लहानपणापासूनच अभ्यासात तल्लक होते. त्यांनी एमए, पीएचडी आणि डीलिट पदव्या मिळवल्या होत्या. 26 मे 1945 रोजी शीला गुजराल यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. इंदर कुमार गुजराल यांचे दीर्घ आजाराने 30 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले.

Inder Kumar Gujral
"तुलसीभाई", WHO च्या प्रमुखांनी विचारले असता PM मोदी म्हणाले...

1 लाख 70 हजार भारतीयांना 'एअरलिफ्ट' करण्यात आली

व्हीपी सिंग आणि चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये गुजराल परराष्ट्र मंत्री होते. गुजराल परराष्ट्रमंत्री असतानाच इराक आणि कुवेतमध्ये आखाती युद्ध सुरु झाले. यादरम्यान तिथे अडकलेल्या 1 लाख 70 हजार भारतीयांना विमानाने सुखरुप परत आणण्यात त्यांना यश आले. विशेष म्हणजे हे जगातील सर्वात मोठे ऑपरेशन मानले जाते. या ऑपरेशनवर आधारित अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'एअरलिफ्ट' हा चित्रपट आला. पंतप्रधान होण्यापूर्वीही गुजराल हे देवेगौडा सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते.

संजय गांधी यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर मंत्रिपद गेले

गुजराल हे आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होते. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी गुजराल यांना आकाशवाणीवर वाचल्या जात असलेल्या बातम्या सेन्सॉर करण्यास सांगितले, परंतु गुजराल यांनी आदेशाचे पालन करण्यास नकार दिला. यानंतर दोघांमध्ये खडाजंगी झाली आणि दुसऱ्याच दिवशी गुजराल यांच्या हातून माहिती आणि प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आले.

Inder Kumar Gujral
'भाजप मुख्यालयावर बुलडोझर चालवा' आपची आक्रमक भूमिका

देशाच्या आणि जगाच्या इतिहासातील 21 एप्रिलच्या महत्त्वाच्या घटना:

  • 2008: कोकणात भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांमधील तिसरा संयुक्त सराव सुरु झाला.

  • 1996: भारतीय हवाई दलातील संजय थापर यांना पॅराशूट करुन उत्तर ध्रुवावर पाठवण्यात आले.

  • 1987: श्रीलंकेची राजधानी असणाऱ्या कोलंबोमधील बॉम्बस्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

  • 1977: मेजर जनरल झियाउर रहमान बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष झाले.

  • 1938: "सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा" लिहिणारे प्रसिद्ध उर्दू भाषेतील कवी मोहम्मद इक्बाल यांचे पाकिस्तानातील लाहोर येथे निधन झाले.

  • 1926: राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म. एलिझाबेथ 1952 मध्ये ग्रेट ब्रिटनची राणी बनली.

  • 1924: करणी सिंग यांचा जन्म. 1961 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारा तो पहिला भारतीय नेमबाज होता.

  • 1910: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि ओडिशाचे (Orissa) 5 वे मुख्यमंत्री सदाशिव त्रिपाठी यांचा जन्म.

  • 1891: भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले डेप्युटी गव्हर्नर जेम्स ब्रॅड टेलर यांचा जन्म.

  • 1526: मुघल शासक बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात पानिपतची पहिली लढाई झाली, ज्यात इब्राहिम लोदी मारला गेला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com