PM Modi
PM Modi Dainik Gomantak
देश

जम्मू-काश्मीर विकासाची नवी गाथा लिहिणार; पंतप्रधान मोदींचे व्हीजन

दैनिक गोमन्तक

जम्मू : जम्मू-काश्मीरामधील कलम 370 ऑगस्ट ( 2019 मध्ये ) हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा जम्मू दौऱ्यावर आहेत. यावेळी सार्वजनिक सभेचे आयोजन केले जाणार असून या सभेच्या पुर्ततेसाठी ३० हजारांहून अधिक पंचायत सदस्यांसह एक लाखाहून अधिक लोकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ( Prime Minister Narendra Modi on his first visit to Jammu)

यादरम्यान, 3100 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधलेल्या बनिहाल काझीगुंड रोड बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच किश्तवाड जिल्ह्यातील 850 मेगावॅट रॅटले जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी केली. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही मजबूत झाली आहे. 370 काढून तुम्हाला मजबूत केले. केंद्र सरकारच्या योजना आता येथे राबवल्या जात आहेत. त्याचा लाभ लोकांना मिळत आहे. जम्मू-काश्मीर विकासाची नवी गाथा लिहिणार आहे. येथील लोकांनी इतिहास घडवला आहे, असे म्हणत काश्मिरवासियांचे मोदींनी कौतूक केले. पंतप्रधान मोदींनी परगण्यात 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले, ज्यामुळे कार्बन न्यूट्रल बनणारी देशातील पहिली पंचायत बनली आहे.

अनेक प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले

पंतप्रधान मोदींनी परगणामध्ये 500 किलोवॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले, ज्यामुळे कार्बन न्यूट्रल होणारी देशातील पहिली पंचायत होईल. J&K मधील जनऔषधी केंद्रांचे जाळे आणखी विस्तारण्यासाठी आणि परवडणाऱ्या किमतीत चांगल्या दर्जाची जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी 100 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. पंतप्रधानांनीही ते राष्ट्राला समर्पित केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT